आरटीई नोंदणी उलथापालथ; एकावर कारवाई, उर्वरित शाळा मुक्त?

10 Feb 2026 21:29:30
पुणे,
rte-registration : पुण्यातील आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशप्रक्रियेत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने ९०९ शाळांपैकी ९०७ शाळांनी नोंदणी पूर्ण केल्याचा दावा केला आहे. मात्र, प्रत्यक्षात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील मोठ्या संख्येने खासगी शाळांनी अजूनही नोंदणी केलीलेली नाही. फक्त एका शाळेवर कारवाई करण्याची घोषणा झाल्यामुळे, उर्वरित शाळांवरही समान न्याय लागू होणार का असा प्रश्न उभा राहिला आहे.
 
 
 
rte
 
 
मेस्टा संघटनेने शाळांवर थकीत शुल्क प्रतिपूर्ती न मिळेपर्यंत नोंदणी प्रक्रियेवर बहिष्कार टाकल्याचे सांगितले आहे. या विलंबामुळे आरटीईतून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात मागे राहावे लागते आणि समान व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा उद्देश बाधित होतो. शिक्षण विभागाने वेळेवर कारवाई करणे गरजेचे असल्याचे पालकांकडून आणि शिक्षण संघटनांकडून वारंवार सूचित केले जात आहे.
Powered By Sangraha 9.0