बोलेरो पिकअपसह 4 गोवंश जप्त

प्राणी क्रूरता कायद्यान्वये गुन्हा दाखल

    दिनांक :11-Feb-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
उमरखेड,
cattle-smuggling : ढाणकी रोड बायपास पुलासमोर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान एका बोलेरो पिकअपमधून चार गोवंश जनावरे अमानुष अवस्थेत वाहतूक करताना पकडली. वाहनासह सुमारे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चालक-मालकाविरुद्ध प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई 11 फेब्रुवारीच्या दुपार दरम्यान करण्यात आली.
 
 
 
y11Feb-Bolero
 
 
 
देवराव गोमाजी मुरमुरे (वय 36, पिरंजी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. गोपनीय माहितीनुसार, बोलेरो पिकअप क्रमांक एमएच26 एडी9164 मध्ये काही गोवंश जनावरे कोंबून, चारापाण्याची कोणतीही सोय न करता बाळदी रोडने उमरखेडकडे येत असल्याची माहिती मिळाली. पोलिस पथकाने ढाणकी रोड बायपास येथे नाकाबंदी केली. तपासणीदरम्यान संबंधित पिकअपमध्ये दोन काळ्या व दोन पांढèया रंगाची अशी चार गोवंश जनावरे दाटीवाटीने, आखूड दोरीने बांधून, हालचालीसाठी पुरेशी जागा न देता वाहतूक करताना आढळली.
 
 
 
जनावरांना चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने त्यांना दुखापत व वेदना होत असल्याचे निदर्शनास आले. जनावरांची अंदाजे किंमत 50 हजार रुपये तर वाहनाची किंमत सुमारे 4 लाख 50 हजार रुपये असून एकूण 5 लाख रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला. या गोवंशांना कत्तलीसाठी नेले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. जप्त जनावरांची पशुवैद्यकीय अधिकाèयांकडून तपासणी करून त्यांना उमरखेड येथील राजस्थानी सेवा समितीच्या गौशाळेत सुरक्षित ठेवण्यात आले आहे. ही कार्यवाही फौजदार सागर इंगळे व जमादार संघशील टेंभारे यांनी केली असून आरोपीविरुद्ध प्राणीक्रूरता प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11 (घ) (ड) (च) (ज) (डा) तसेच महाराष्ट्र प्राणी रक्षण सुधारणा अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास उमरखेड पोलीस करत आहेत.