फिडर पिलरमध्ये हात घालल्याने व्यक्तीचा जळून मृत्यू

11 Feb 2026 15:55:08
पुणे
Jijuri electrocution, 22 kV feeder accident शहरातील चिंचेच्या बागेजवळील कडेपठार रोड परिसरात मंगळवारी (दि. १०) रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली. २२ केव्ही जेजुरी फिडर पिलरचा दरवाजा उघडून आत हात घालल्यामुळे एका अनोळखी व्यक्तीस जोरदार विजेचा धक्का बसला. शॉक इतका तीव्र होता की संबंधित व्यक्ती जळून जागीच मृत्यूमुखी पडला.
 

फिडर पिलरमध्ये हात घालल्याने व्यक्तीचा जळून मृत्यू 
 
प्राथमिक माहितीनुसार, Jijuri electrocution, 22 kV feeder accident  मृत व्यक्ती रिकाम्या बाटल्या गोळा करणारा असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे, मात्र त्याची अधिकृत ओळख अद्याप पटलेली नाही. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ महावितरण आणि पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिस कर्मचारी, महावितरणचे अधिकारी, जेजुरी नगरपरिषदेची अग्निशमन यंत्रणा आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. सुरक्षिततेच्या दृष्टीने वीजपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला. अग्निशमन दलाने जळत असलेल्या व्यक्तीवरील जाळ विझवून त्याला फिडर पिलरमधून बाहेर काढले आणि तातडीने रुग्णालयात हलविले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
 
 
जेजुरी पोलिस पुढील तपास करत असून, महावितरण विभागाने नागरिकांना वीज वितरणाच्या उपकरणांपासून दूर राहण्याचे आणि अशा ठिकाणी अनधिकृत प्रवेश टाळण्याचे आवाहन केले आहे.
Powered By Sangraha 9.0