मुंबई,
Pragati Kolge director, मनोरंजनासोबत सशक्त आशयाची सांगड घालत रसिकांच्या मनात घर करणाऱ्या कलाकृती मराठी चित्रपटसृष्टीत सातत्याने निर्माण होत आहेत. याच परंपरेत अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या प्रगती कोळगे यांनी दमदार पाऊल टाकत ‘जब्राट’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. तारा करमणूक निर्मित हा चित्रपट येत्या २० फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
परदेशात वास्तव्यास असूनही प्रगती कोळगे यांनी मराठी भाषा, संस्कृती आणि मातीतली नाळ जपली आहे. ‘पल्याडवासी’नंतर ‘जब्राट’ हा त्यांचा दुसरा सिनेनिर्मितीचा प्रयत्न आहे. मनोरंजनासोबतच विचार करायला लावणारा संदेश देण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आल्याचे त्या सांगतात.
‘जब्राट’ हा आजच्या Pragati Kolge director, तरुणाईवर आधारित संगीतमय आणि रंगतदार चित्रपट आहे. बेधुंदपणे जगणारी, पण आयुष्यातील आव्हानांना तितक्याच धैर्याने सामोरे जाणारी तरुण पिढी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. मैत्री, प्रेम, संगीत, मस्ती आणि डान्स यांचा संगम असलेली ही कथा तरुणांच्या भावविश्वाला स्पर्श करणारी आहे. आजच्या काळात कसे जगायचे, निर्णय कसे घ्यायचे आणि नात्यांना कसे जपायचे, याचा वेध चित्रपटातून घेतला असल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे.दिग्दर्शिका प्रगती कोळगे सांगतात, “तुम्ही उत्तम देण्याचा प्रयत्न केलात तर त्याला प्रतिसादही उत्तमच मिळतो. ‘जब्राट’च्या कथेसाठी आम्हाला फ्रेश चेहऱ्यांची गरज होती. त्यामुळे ऑडिशन्सद्वारे नवे कलाकार घेतले असून त्यांना अनुभवी कलाकारांची साथ लाभली आहे.” प्रेक्षकांना निखळ मनोरंजनासोबत काहीतरी वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी नमूद केले.चित्रपटात आयुष संजीव, अनुष्का सरकटे, वनिता खरात, श्रेया शंकर, राहुल चव्हाण, पुण्यकर उपाध्याय, आयली घिया, हिंदवी पाटील, मंदार मोकाशी, डॉ. ऋषभ गायकवाड, सोहम कांबळे, विक्रम आल्हाट आणि प्रगती कोळगे हे नवे चेहरे झळकणार आहेत. त्यांच्यासोबत संजय मोने, सुरेखा कुडची, जयवंत वाडकर आणि गणेश यादव यांसारखे अनुभवी कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.चित्रपटाचे निर्माते अनिल अरोरा, गोविंद मोदी आणि प्रगती कोळगे आहेत. अनिकेत खंडागळे यांनी छायांकन केले असून संगीताची धुरा डॉ. जयभीम शिंदे यांनी सांभाळली आहे. सहाय्यक असोसिएट म्हणून चार्लेस गोम्स यांनी काम पाहिले असून वेशभूषा युगेशा ओमकार यांनी साकारली आहे.मनोरंजनासोबतच सकारात्मक संदेश देणारा आणि तरुणाईच्या जगण्याला नवा दृष्टिकोन देणारा ‘जब्राट’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला आहे. आता २० फेब्रुवारीला हा ‘जब्राट’ अनुभव रसिकांना कितपत भावतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.