जीव झाले स्वस्त ... मुदत संपलेली औषधे ठरली जीवघेणे

    दिनांक :11-Feb-2026
Total Views |
नाशिक,
Nashik expired medicines, विंचूर येथील शासकीय आयुर्वेदिक दवाखान्यात रुग्णांना मुदत संपलेली औषधे देण्यात आली असल्याचे उघडकीस आले असून, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप आणि आरोग्य यंत्रणेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. स्थानिक रहिवासी योगेश सोनवणे काही दिवसांपूर्वी मळमळ व जुलाबाच्या तक्रारीसाठी या दवाखान्यात गेले होते. उपचाराच्या भाग म्हणून त्यांना ओआरएसच्या पुड्या देण्यात आल्या, मात्र तपासणी केल्यावर त्या डिसेंबर २०२५ मध्ये कालबाह्य झालेल्या होत्या.
 
 

Nashik expired medicines, Winchur government Ayurvedic hospital, 
या प्रकारामुळे नागरिकांनी आरोग्य विभागाच्या बेजबाबदारीवर गंभीर टीका केली आहे. दवाखान्यातील औषधांचा अपुरेपणा आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियमित अनुपस्थिती नागरिकांसाठी चिंता निर्माण करणारी ठरत आहे. विंचूर शहराची लोकसंख्या १५ हजारांहून अधिक असून, आसपासच्या गावांतील रुग्णही येथे उपचारासाठी येतात. मात्र महत्त्वाची औषधे कालबाह्य असल्याने रुग्णांना कधीकधी खासगी मेडिकलकडे धाव घ्यावी लागते.
 
 
ग्रामस्थांनी सखोल चौकशीची मागणी Nashik expired medicines,  केली आहे. त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणे, दवाखान्यात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी असणे, तसेच औषधसाठ्याची नियमित तपासणी करणारी यंत्रणा कार्यान्वित करणे आवश्यक असल्याचेही सांगितले आहे. परिसरातील नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीती आणि संताप निर्माण झाला असून, प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजीत कोशिरे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, संबंधित रुग्णाच्या ८ घरी जाऊन औषधे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. दवाखान्यातील कालबाह्य औषधे काढून टाकण्याचे आदेश दिले असून भविष्यात असे निष्काळजीपणा टाळण्यासाठी औषधसाठ्याची नियमित तपासणी आणि जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देशही दिले आहेत. “घटनेची चौकशी करून कारवाईबाबत निर्णय घेऊ,” असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
 
 
या प्रकारामुळे विंचूर परिसरातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांची मागणी आहे की प्रशासन गंभीरतेने लक्ष देऊन भविष्यात अशा घटना टाळाव्यात.