‘पंच परिवर्तन’ नव्या भारताची पंचसूत्री : डॉ. नितीन खर्चे

11 Feb 2026 20:48:44
तभा वृत्तसेवा
दारव्हा,
nitin-kharche : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षासाठी जाहीर केलेली पंच परिवर्तन एक पंचसूत्री आहे. जी सामाजिक बदलांवर विशेष भर देते. या पंचसूत्रीच्या अनुसरणाने राष्ट्राचा सर्वांगीण विकास व प्रगतीस हातभार लागतो, असे मौलिक विचार डॉ. नितीन खर्चे यांनी मांडले.
 
 
 
y11Feb-Kharche
 
 
 
तरुण सागर महाराजांच्या प्रेरणेने जनसेवा बहुउद्देशीय संस्था, शी समर्थ गजानन महाराज संस्थान,प्रेम गोरक्षण संस्था दारव्हा, यवतमाळ अर्बन को. ऑप . बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय व्याख्यानमालेत दुसèया दिवसाचे पुष्प गुंफतांना ते बोलत होते. ‘पंच परिवर्तन’ हा व्याख्यानाचा प्रमुख विषय होता.
 
 
या व्याख्यानमालेत डॉ. खर्चे यांनी देशातील बदलत्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करताना पुढे म्हणाले की, आज देशात सामाजिक समरसता प्रस्थापित करणे,भारतीय संस्कृती आणि मूल्यांचे संवर्धन, कुटुंबव्यवस्था बळकटी करणे, निसर्गाचे रक्षण आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करणे जरुरी आहे. तर देशाप्रती जबाबदारीची जाणीव आणि स्वदेशी उत्पादनांचा दैनंदिन जीवनात वापर वाढवून देश स्वावलंबी घडविणे. यासारख्या असंख्य मौलिक पैलूंवर डॉ. नितीन खर्चे यांनी प्रकाश टाकून अशा विचारांच्या अनुसरणाची राष्ट्राला गरज व्यक्त केली. सदर व्याख्यानमालेस श्रोत्यांनी बहुसंख्येने प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंचावर सुधाकर दरेकर, समर्थ गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष डॉ. मदन पोटफोडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गजानन गाभे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन दिलीप दांगडा तर आभार मोहन सरागे यांनी मानले. कार्यक्रमाला बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0