रिल्स स्टार प्रथमेश कदमच्या मृत्यूमागील सत्य उघड; आईने व्हिडिओत सांगितले खरे कारण

    दिनांक :11-Feb-2026
Total Views |
मुंबई, 
prathamesh-kadam-death-reason रील स्टार प्रथमेश कदमचे 26 जानेवारी रोजी अकाली निधन झाले, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. हॉस्पिटलमध्ये असतानाही प्रथमेश रील्स बनवत होता, पण अचानकच त्यांच्या निधनाची बातमी समोर आली. अनेक चाहत्यांनी त्यांच्या आई आणि बहिणीला मेसेज केले, तर काहींनी अफवा पसरवल्या की प्रथमेशने आत्महत्या केली. या सर्व चर्चांमुळे हतबल झालेल्या प्रथमेशच्या आईने प्रज्ञा कदम यांनी व्हिडीओ शेअर करून अफवांना पूर्णविराम दिला.
 
prathamesh-kadam-death-reason
 
व्हिडीओमध्ये प्रज्ञा कदम भावूक दिसत आहेत आणि त्यांनी स्पष्ट केले की, प्रथमेशच्या मृत्यूमागचं कारण आत्महत्या नाही, तर त्याच्या रक्तात ‘सफेद कावीळ’ पसरल्यामुळे त्याची प्रकृती खालावली आणि उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यांनी सांगितलं की, सुरुवातीला सर्व रिपोर्ट्स नॉर्मल होते आणि डॉक्टरांनी आश्वासन दिलं होतं की दोन-तीन दिवसांत तो बरा होईल, पण शेवटच्या क्षणी ही कावीळ संपूर्ण शरीरात पसरली.  prathamesh-kadam-death-reason 26 जानेवारीच्या सकाळी प्रथमेशने अखेरचा श्वास घेतला. प्रज्ञा कदम यांनी सर्वांनाच विनंती केली आहे की, त्यांच्या मुलाच्या मृत्यूबाबत चुकीच्या बातम्या किंवा अफवा पसरवू नयेत. शरीरात पसरलेल्या गंभीर कावीळमुळेच हा दुर्दैवी अंत झाला, हेच सत्य आहे, असे त्यांनी या व्हिडिओद्वारे स्पष्ट केले आहे.