उच्चभ्रू सोसायटीमध्ये गुन्हेगारीचे वृत्त

मालकासह पाच जणांवर कारवाई

    दिनांक :11-Feb-2026
Total Views |
पुणे
Pune illegal hookah parlour उच्चभ्रू सोसायटीमध्ये विनापरवाना सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर सहकारनगर पोलिसांनी छापा टाकून मालकासह पाच जणांवर कारवाई केली. या कारवाईत १२ हजार ४९५ रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले असून, संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Pune illegal hookah parlour, Sahakarnagar police action, 
धनकवडी येथील राजमुद्रा हौसिंग सोसायटीतील गुरुनानक कृपा बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरील टेरेसवर हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी हॉटेल मालक राजसिंग भजनसिंग गोरोवाडा (वय ३५, रा. गुरुनानक कृपा बिल्डिंग, तिसरा मजला, राजमुद्रा सोसायटी, धनकवडी), वेटर पारस परमानंद शर्मा (२४, मूळ रा. नेपाळगंज, जि. बाके, नेपाळ), तसेच सुभाष मानसिंग गिरी (२०), तिलक भोला तिवारी (३५) आणि नारायण मेघे आचार्य (३४, सर्व मूळ रा. नेपाळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
सहकारनगर पोलिस ठाण्यातील Pune illegal hookah parlour अधिकारी आणि अंमलदार ९ फेब्रुवारी रोजी पेट्रोलिंगदरम्यान गुलाबनगर चौक परिसरात होते. त्यावेळी पोलिस हवालदार अमोल पवार यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मेहेर लिव्हिंग बिल्डिंग शेजारील श्री गुरुनानक कृपा बिल्डिंगच्या टेरेसवर विनापरवाना हुक्का पार्लर सुरू आहे. या माहितीची खातरजमा केल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांची टीम घटनास्थळी रवाना करण्यात आली.पोलिसांनी तिसऱ्या मजल्यावरील टेरेसवर जाऊन लाकडी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेथे हॉलमध्ये सहा टेबल मांडलेले आढळले. त्यापैकी चार टेबलांवर आठ जण हुक्क्याचे फ्लेवर सेवन करताना आढळून आले. किचनची पाहणी केली असता विविध फ्लेवरने भरलेल्या चिलीम, हुक्का पॉट आणि अन्य साहित्य मिळून आले.पोलिसांनी एकूण १२ हजार ४९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, संबंधितांविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.