दिवसाढवळ्या बिबट्या आला रे आला..!

11 Feb 2026 15:35:12
पुणे,
Mengdewadi leopard मेंगडेवाडी परिसरात पुन्हा बिबट्याची हालचाल पाहायला मिळाल्याने स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रणपिसे वस्ती जवळ माजी सरपंच भरत फल्ले यांच्या शेतात रविवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास बिबट्या फिरताना दिसला.
 

दिवसाढवळ्या बिबट्या आला रे आला..! 
दोन दिवसांपूर्वी याच परिसरात बिबट्याचे पायाचे ठसे आढळल्याने नागरिकांनी वन विभागाकडे तातडीने कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार वन विभागाने शनिवार (दि. ७) रोजी बिबट्याला पकडण्यासाठी त्या ठिकाणी पिंजरा लावला होता. मात्र रविवारी सकाळी भरत फल्ले शेताची पाहणी करण्यासाठी गेले असता, पिंजऱ्याच्या आसपास बिबट्या वावरताना त्यांचे निदर्शनास आला.वन विभागाने पिंजऱ्यात भक्ष ठेवल्या असूनही बिबट्या त्यात अडकलेला नाही, त्यामुळे वन विभागासमोर आव्हान उभे राहिले आहे. विशेष म्हणजे बिबट्याने दिवसा दर्शन दिल्यामुळे परिसरातील शेतकरी अधिकच सतर्क झाले आहेत आणि शेतात एकटे जाणे टाळण्याचा सल्ला दिला जात आहे.ग्रामस्थांनी वन विभागाला मागणी केली आहे की, परिसरावर गस्त वाढवून बिबट्याला लवकरात लवकर पकडावे. दरम्यान, वन विभागाकडून परिसरावर लक्ष ठेवले जात असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0