पुणे
Kothrud constituency infrastructure, भूसंपादन आणि इतर विकासकामांसाठी राज्य सरकारकडून निधी मिळूनही कोथरूड मतदारसंघातील मिसिंग लिंक जोडण्याचे काम का रखडले आहे, असा सवाल राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केला.
मंत्री पाटील यांनी कोथरूड मतदारसंघातील विविध कामांच्या प्रगतीसंबंधी चर्चा करण्यासाठी महापालिकेत बैठक घेतली. या बैठकीला महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे तसेच संबंधित विभागांचे अन्य अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत सोमेश्वरवाडी, Kothrud constituency infrastructure, सुतारवाडी, पाषाण, बाणेर आणि बालेवाडी भागातील मिसिंग लिंकबाबत सविस्तर चर्चा झाली. अधिकाऱ्यांनी या भागातील जमीन अधिग्रहणातील तांत्रिक अडचणी, अतिक्रमणे आणि अन्य अडथळ्यांबाबत माहिती दिली.यावर प्रतिक्रिया देताना आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांना सूचित केले की, संबंधित भागाची पाहणी करून अहवाल सादर करावा, जेणेकरून पुढील उपाययोजना त्वरित राबवता येतील. मंत्री पाटील यांनी या कामांच्या त्वरीत सुरुवातीसाठी अधिकाऱ्यांना वेळेत निर्णय घेण्याचे आवाहन केले.कोथरूड मतदारसंघातील या मिसिंग लिंक जोडणीची कामे पूर्ण झाल्यास स्थानिक रहिवाशांना वाहतूक आणि संपर्काच्या दृष्टीने मोठा फायदा होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.