अचानक पोलीस पथके परिसरात शिरल्याने एकच 'खळबळ'

    दिनांक :11-Feb-2026
Total Views |
पुणे,
Budhwar Peth operation पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरात बुधवार मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत अभूतपूर्व पोलिस हालचाल पाहायला मिळाली. सुमारे १५० पोलीस कर्मचाऱ्यांनी रस्ते बंद करत अवैध धंद्यांविरोधात मोठी मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान मानवी तस्करी, अमली पदार्थांचा साठा आणि संशयितांची चौकशी करण्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले गेले.
 

Pune police raid, Budhwar Peth operation 
घराची तपासणी
मध्यरात्री सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास Budhwar Peth operation पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी बुधवार पेठेला चारही बाजूंनी वेढा घातला. परिसरातील सर्व रस्ते बॅरिकेड्सद्वारे बंद करण्यात आले होते. दुचाकी, चारचाकी तसेच पायी जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्यात आली, त्यामुळे संपूर्ण परिसरात कडक पोलिस बंदोबस्त दिसून आला.या धडक मोहिमेत स्थानिक पोलीस, महिला पोलीस तसेच गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. गल्लीबोळांमध्ये अचानक पोलीस पथके शिरल्याने परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी ५० पेक्षा अधिक संशयित घरे आणि कुंटणखान्यांच्या खोल्यांची झडती घेतली. तपासात मानवी तस्करी तसेच अमली पदार्थांचा साठा लपवलेला आहे का, याचा विशेष शोध घेण्यात आला.
 
 
या कारवाईमागील पार्श्वभूमी Budhwar Peth operation अशी आहे की, काही दिवसांपूर्वी फरासखाना पोलीस ठाण्यातील एका महिला कर्मचाऱ्यावर बांगलादेशी तरुणीला वाचवण्यासाठी पैशांची देवाणघेवाण केल्याचा आणि वरिष्ठांना माहिती न दिल्याचा आरोप लागल्यामुळे तिला निलंबित करण्यात आले होते. या घटनेनंतर पुणे पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवार पेठेतील अवैध कारवायांवर कठोर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार हे कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले.
देहव्यवसाय करण्याचा संशय?
या मोहिमेची तीन प्रमुख उद्दिष्टे निश्चित करण्यात आली होती. अल्पवयीन मुलींना फसवणूक किंवा जबरदस्तीने देहव्यवसायात ढकलणाऱ्या दलालांचा शोध घेणे, परिसरात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवणे आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदा राहणाऱ्या परदेशी नागरिकांची, विशेषतः बांगलादेशी नागरिकांची ओळख पटवणे, हे या कारवाईचे मुख्य उद्देश होते.शुक्रवार पेठ पोलीस चौकी परिसरात महिला पोलिसांनी कुंटणखान्यातील महिलांशी संवाद साधून माहिती गोळा केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध धंद्यांवर मोठा आघात झाला असून, भविष्यात या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यात मदत होईल, अशी अपेक्षा आहे.