पुणे जिल्हा परिषदेला ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात 'राज्यात प्रथम क्रमांक'

11 Feb 2026 15:53:17
पुणे,
Pune Zilla Parishad  मुख्यमंत्री यांच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील शासकीय कार्यालयांच्या कार्यक्षमतेचे स्पर्धात्मक मूल्यमापन करण्यात आले असून, पुणे जिल्हा परिषदेला २०० पैकी १९६.२५ गुणांसह राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. याचबरोबर सेवाकर्मी कार्यक्रमातही पुणे जिल्हा परिषदेला ‘विशेष प्रशंसनीय’ म्हणून निवड करण्यात आले आहे.
 

Pune Zilla Parishad 
या मूल्यमापनात कार्यालयाची Pune Zilla Parishad  अधिकृत वेबसाइट, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफिस, स्मार्ट डॅशबोर्ड, व्हॉट्सॲप एआय चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), ब्लॉकचेन आणि भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) या सात प्रमुख घटकांवर कामगिरीचा आढावा घेतला गेला होता. पुणे जिल्हा परिषदेने या सर्व निकषांवर उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात आघाडी मिळवली.याआधी मुख्यमंत्री १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमातही पुणे जिल्हा परिषदेने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेने डिजिटल प्रशासनाच्या क्षेत्रात अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. यामुळे नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद सेवा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
 
१५० दिवसांच्या कार्यक्रमात Pune Zilla Parishad  उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक शालिनी कडू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात यांच्यासह सर्व विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सीईओ गजानन पाटील यांनी विशेष कौतुक केले. तसेच सादरीकरण व समन्वयाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल सामान्य प्रशासन विभागाचेही विशेष अभिनंदन करण्यात आले.मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी यावेळी सांगितले की, “डिजिटल प्रशासन ही काळाची गरज आहे आणि पुणे जिल्हा परिषद देशात एक मॉडेल म्हणून उभी राहील. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक आहे.”
Powered By Sangraha 9.0