बळीराजासाठी आनंदवार्ता! कर्ज संकटात दिलासा

    दिनांक :11-Feb-2026
Total Views |
नवी दिल्ली,
RBI Kisan Credit Card update भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेत मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसंबंधी कर्ज घेणे आणि परतफेड करणे अधिक सोपे होईल. RBI लवकरच बँकांना या बदलांसाठी इंटीग्रेटेड आणि अपडेटेड मार्गदर्शक सूचना देणार आहे, ज्यामुळे कृषी कर्जाचे स्वरुप, मंजूरी प्रक्रिया आणि वापर अधिक स्पष्ट होईल.
 

RBI Kisan Credit Card update 
सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे KCC कर्जाचा कालावधी सहा वर्षांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. याचा अर्थ शेतकऱ्यांना आता क्रेडिट कार्डअंतर्गत मिळणारे कर्ज दीर्घकालीन वापरासाठी उपलब्ध राहील आणि परतफेड करण्यासाठी अधिक वेळ मिळेल. त्यामुळे हंगामानुसार कर्ज परतफेड करणे शेतकऱ्यांसाठी सुलभ होईल आणि आर्थिक नियोजन अधिक सोपे होईल.
 
 
RBI शेतकऱ्यांच्या “Scale of Finance” नुसार कर्ज मर्यादा RBI Kisan Credit Card update बदलण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतीच्या खर्चानुसार अचूक आणि योग्य प्रमाणात कर्ज मिळू शकेल. याअंतर्गत अनेक शेतकऱ्यांना अधिक कर्ज मिळण्याची शक्यता आहे, जे त्यांच्या शेतीसाठी मोठा दिलासा ठरेल.याशिवाय, KCC अंतर्गत आता आधुनिक कृषी उपकरणे, स्मार्ट औद्योगिक आवजारे आणि इतर कृषी साधने खरेदी करण्याचा प्रस्तावही समोर आला आहे. या बदलांमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे अधिक सुलभ होईल. तसेच, नियम अधिक स्पष्ट, पारदर्शक आणि सुसंगत केले जातील, ज्यामुळे कर्ज मिळवण्याची प्रक्रिया झटपट आणि सोपी होईल.अद्याप ही सुधारित योजना कधीपासून लागू होईल, याची अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही. मात्र लवकरच RBIकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. या बदलांमुळे देशातील शेतकऱ्यांना दीर्घकालीन आर्थिक आणि तंत्रज्ञानाशी संबंधित मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.