मुंबई,
Sanjay Raut अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाची तटस्थ चौकशी होण्याची गरज असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. “सीआयडी चौकशी करणार नाही. हा प्रकरण तांत्रिक आहे, रहस्यमय आहे आणि काही प्रमाणात राजकीय आहे,” असे राऊत यांनी म्हटले.
ते म्हणाले, “पूर्व विदर्भातील नेते कोण आहेत, ते भाजपचे आहेत की राष्ट्रवादीचे, हे सांगायला हरकत नाही. जर त्या नेत्यांनी अजित पवारांना उशिरा येण्यास भाग पाडले किंवा त्यांचा मोटारीचा कार्यक्रम रद्द केला, तर त्या नेत्याची चौकशी होणे आवश्यक आहे. कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या फाईलवर सही केली होती, या सर्व गोष्टी तपासल्या पाहिजेत.”सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांच्या भेटीसाठी सकाळपासून कोणी नेता आलेला नाही, आणि त्यांना प्रफुल्ल पटेल यांच्या घरी नाष्ट्यासाठी जावे लागले. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, “हा पक्षांतर्गत विषय आहे. उपमुख्यमंत्री असूनही सर्वकाही पक्षात ठिकं नसते, एवढंच मी सांगू शकतो.”
लोकसभा अध्यक्षांविरोधात Sanjay Raut अविश्वास प्रस्तावावरही राऊत यांनी आपले मत व्यक्त केले. “आम्ही प्रस्तावाच्या बाजूने आहोत. संसदेत ज्या प्रकारे विरोधी पक्ष नेत्याला बोलू दिलं जात नाही, राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर आवाज उठवू दिला जात नाही, त्याला विरोध करण्यासाठी अविश्वास ठरावास शिवसेनेचा पाठिंबा असेल,” असे त्यांनी नमूद केले.एपस्टिन फाईल्स प्रकरणाबाबत ब्रिटिश पंतप्रधानांवर दबाव आहे की नाही, असा प्रश्न विचारल्यावर राऊत म्हणाले, “ब्रिटिश पंतप्रधान राजीनामा देऊ शकतात, पण आपल्या देशात दबावाला कोण विचारतो?”अजित पवार विमान अपघात प्रकरण सध्या तांत्रिक, राजकीय आणि पक्षीय दृष्टीकोनातून चर्चेचा विषय ठरत आहे. संजय राऊत यांनी तटस्थ चौकशीची मागणी केली असून, पक्षांतर्गत राजकारणही या प्रकरणात चर्चेत राहणार आहे.