उत्तर प्रदेश
Shreyas Talpade fraud case, चित्रपट अभिनेता श्रेयस तळपदे यांच्यासह १२ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आल्याने मनोरंजन क्षेत्रात आणि चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मैनपुरी जिल्ह्यातील भोगांव पोलीस ठाण्यात १० फेब्रुवारी रोजी हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
भोगांव येथील मोहल्ला मिश्राणा परिसरातील एका रहिवाशाने न्यायालयात तक्रार दाखल करत अभिनेता श्रेयस तळपदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. तक्रारीनुसार, संबंधितांनी स्थानिक नागरिकांना आकर्षक परताव्याचे आश्वासन देत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. मात्र, पैसे परत मागितल्यावर गुंतवणूकदारांना टाळाटाळ करण्यात आली, असा आरोप आहे.एफआयआरमध्ये श्रेयस तळपदे यांच्यासह समीर अग्रवाल, सानिया अग्रवाल, आर. के. सेट्टी, संजय मुदगिल, शबाब हुसेन, नरेंद्र नेगी, पंकज अग्रवाल, सुप्रिया, अनुज जैन, अजय श्रीवास्तव आणि अरविंद त्रिपाठी यांची नावे नमूद करण्यात आली आहेत. सागा ग्रुपचे संचालक समीर अग्रवाल आणि त्यांची पत्नी सानिया अग्रवाल यांनी २०१५ साली परिसरात एलयूसीसी बँकेची शाखा सुरू केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या शाखेत शेकडो नागरिकांनी गुंतवणूक केल्याचा दावा करण्यात आला आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, Shreyas Talpade fraud case, सुरुवातीला विश्वासार्ह व्यवहार होत असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. मात्र, काही वर्षांनंतर गुंतवणूकदारांनी पैसे परत मागण्यास सुरुवात केली असता त्यांना नकार देण्यात आला. तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. २०२४ मध्ये संबंधित बँकेने अचानक कामकाज बंद केल्याने गुंतवणूकदारांची अडचण वाढली.पीडित गुंतवणूकदारांनी त्यांच्या ठेवींची कागदपत्रे उपलब्ध असल्याचे सांगितले असून, लाखो रुपयांची रक्कम अडकून पडल्याचा दावा केला आहे. बँकेचे कामकाज ठप्प झाल्याने अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत. याप्रकरणी केवळ मैनपुरी जिल्ह्यातच नव्हे, तर उत्तराखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील काही भागांतील नागरिकांचीही फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर भोगांव Shreyas Talpade fraud case, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. संबंधित सर्व व्यक्तींची भूमिका, आर्थिक व्यवहारांची साखळी आणि गुंतवणुकीचे स्वरूप याबाबत चौकशी केली जात असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या प्रकरणात पुढील तपासानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.