भारत विकास परिषदेची आजपासून राष्ट्रीय परिषद

    दिनांक :12-Feb-2026
Total Views |
नागपूर : 
'Bharat Vikas Parishad' भारत विकास परिषदेची राष्ट्रीय परिषद बैठक १३ व १४ फेब्रुवारीला रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात होत असून देशभरातील तीनशेहून अधिक पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. आदर्शकुमार गोयल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी सांगितले की, या दोन दिवसांच्या बैठकीत संघटनात्मक संबंधित सेवा व संस्कृतीच्या विविध पैलूंचा तसेच राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा आढावा घेतला जाईल, भविष्यातील कृती योजना आखल्या जातील. या बैठकीचा प्रारंभ रा. स्व. संघाचे सहसरकार्यवाह के.सी. मुकुंद यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या शुक‘वारी १३ फेब‘ुवारीला सकाळी १० वाजता होईल.
 
 
 
'Bharat Vikas Parishad'  बैठकीच्या विविध सत्रांमध्ये सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व संघटनात्मक मुद्यांवर सविस्तर चर्चा जाणार आहे. परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस दुर्गादत्त शर्मा यांनी सांगितले की, परिषदेने आपले काम अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी देशात १० प्रदेश व ८० प्रांतांमध्ये रचना करण्यात आली आहे. या प्रदेशांमध्ये सेवा व संस्कृती-आधारित उपक‘मांद्वारे समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सतत काम केले जात आहे. परिषदेचे राष्ट्रीय संघटन मंत्री सुरेश जैन की, १० जुलै १९६३ रोजी स्थापन झालेल्या भारत विकास परिषदेच्या आज देशभरात १६०० हून अधिक शाखा व ८५ हजारांहून अधिक कुटुंबातील सदस्य आहेत.
 
 
'Bharat Vikas Parishad'  शालेय विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये व देशभक्ती रुजवण्यासाठी देशभक्तीपर गाणे गट गायन, भारताला जाणून घ्या स्पर्धा, गुरू वंदन-छात्र अभिनंदनसारखे कार्यक‘म आयोजित करते. देशभरातील १३ अपंगत्व केंद्रांद्वारे दरवर्षी अंदाजे हजार कृत्रिम अवयव, कॅलिपर, कुबड्या व पोलिओ शस्त्रकि‘या पुरवते. देशभरात सुरू असलेल्या इतर सेवा कार्यांची माहिती त्यांनी दिली. या बैठकीत राष्ट्रीय कार्यकारिणी निवड केली जाणार आहे. भारत विकास परिषदेचे विदर्भ प्रांत अध्यक्ष पद्माकर धानोरकर, सरचिटणीस आसावरी वरकड , राष्ट्रीय समन्वयक चंद्रशेखर घुशे, क्षेत्रीय सेवा सचिव संजय गुळकरी, सहसंयोजक छाया चंद्रकांत रागीट, प्रांत वित्त सचिव दिलीप गुळकरी, वसंत काकडे, कौस्तुभ लुले, राजश्री बाबर, कविता भोसले, समन्वयक सीमा मुन्शी व इतर कार्यकर्ते बैठकीच्या व्यवस्थेत आहेत.