एका कारने दोन दुचाकींना उडविले

    दिनांक :12-Feb-2026
Total Views |
दोन ठार : एक गंभीर

वणी, 
Car bike accident वणी-घुग्घुस रोडवरील पुनवट-पुरड जवळ झालेल्या अपघातात एका भरधाव दोन दुचाकीला मागून धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. बुधवार, ११ फेब‘ुवारीच्या रात्री ८.१५ च्या सुमारास ही घटना घडली. विजय जनार्धन धोबे (४८, गुरुनगर, वणी) आणि रवी मंगेश पोहरे (४८, शात्रीनगर, वणी) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
 
 
apghat
 
कारचालक हा वणीतील रहिवासी असून तो टाटा कर्व कारने एमएच२९ सीजे०६०७ ने चंद्रपूरहून वणीच्या दिशेने येत होता. याच वेळी वणीतील विजय व रवी हे एका दुचाकीने तर पुनवट येथील महेंद्र निब‘ड व त्यांचा मुलगा दुसर्‍या दुचाकीने वणीच्या दिशेने येत होते. दरम्यान रात्री सव्वा सुमारास पुनवट व पुरड दरम्यान या भरधाव कारने दोन्ही दुचाकींना मागून जबर धडक दिली. अपघात होताच रस्त्यावरील प्रवाशांनी शिरपूर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मदतकार्यास सुरुवात झाली.
 
 
Car bike accident  या अपघातात एका दुचाकीवरील विजय जनार्धन धोबे व रवी मंगशे कोहळे यांचा मृत्यू झाला. तर दुसर्‍या दुचाकीवरील तुळशीराम निब‘ड (वय ४०) व त्यांचा मुलगा गौरव महेंद्र निब‘ड हे दोघे जखमी झालेत. यातील एकाची प्रकृती गंभीर असून त्याला उपचारासाठी नागपूर येथे पाठविण्यात आल्याची माहिती आहे.