'Dharmbhaskar Sadgurudas Maharaj' धर्मभास्कर सद्गुरूदास महाराज उपाख्य शिवकथाकार विजयराव देशमुख यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी अत्यंत शोकाकूल वातावरणात अन्त्यसंस्कार करण्यात आले. काल सायंकाळी त्यांचे विवेका रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव‘ धक्क्याने निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने अनेकांनाधक्का बसला. गुरू मंदिर परिवारावर शोककळा पसरली. त्यांचे पार्थिव त्यांच्या जयप्रकाशनगरातील गुरू निवासस्थानी दर्शनार्थ ठेवण्यात आले. नागपूर, विदर्भ व महाराष्ट्रातील अनेकांनी त्यांच्या जयप्रकाशनगरातील निवासस्थानी धाव घेतली. .
आधारवड कोसळल्याने हुंदके, असंख्य आठवणी व उमाळे यांनी आसमंत भरून गेला. गुरुवारी सकाळपासून अंत्यदर्शनार्थ रिघ लागली होती. राष्ट्र सेविका समितीच्या अ.भा. सहकार्यवाहिका चित्राताई जोशी, रा. स्व. संघाचे प्रचारक रवींद्र भुसारी, विदर्भ प्रांत सह प्रचारक जावडे, श्री नरकेसरी प्रकाशनचे अध्यक्ष व प्र‘यात होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे, रा.स्व. संघाचे धरमपेठ भाग संघचालक श्याम पत्तरकिने, दै. तरुण भारतचे माजी मुख्य संपादक लक्ष्मणराव जोशी, माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे, कल्याणी देशमुख, छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे अनंत महाजन, हनुमंत महाजन, राजे मुधोजी भोसले, ज्येष्ठ निरुपणकार डॉ. स्वानंद पुंड, श्रीराम जोेशी यांनी अंत्यदर्शन घेतले.
'Dharmbhaskar Sadgurudas Maharaj' बासर, विदर्भातील भांबेरी, अकोला, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली आदी केंद्रांचे उपासक सातत्याने येत होते व मंदिरात महाराजांच्या पार्थिवाचे दर्शन घेत होते. त्यानंतर दुपारी उपस्थित हजारो भाविकांनी सामूहिक प्रार्थना व उपासना केली. महाराजांचे पार्थिव मंदिरातून तळमजल्यावर आणण्यात आले. त्यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी महाराजांना डोळे भरून पाहण्यासाठी गर्दी दुपारी संपूर्ण सरंजामासह निघालेल्या अन्त्ययात्रेत प्रत्येकजण पायी सहभागी झाला.
ज्या रस्त्यावरून अन्त्ययात्रा मार्गक‘मण करणार होती, त्या रस्त्यावर रांगोळ्या, फुलांची सजावट करण्यात आली होती. पुढे फुलांनी सजविलेला छत्र, चामर व भगवा ध्वज असलेला रथ तयार होता. त्यावर महाराजांचे पार्थिव ठेवण्यात आले. त्यानंतर मंदिरापासून अन्त्ययात्रा प्रारंभ झाली. त्यावेळी संपूर्ण मार्गावर महिला, भाविक दुतर्फा उभे होते. प्रत्येकाच्या डोळ्यात आसवं होती व फुलांचा वर्षाव सुुरू होता. अन्त्ययात्रेत सर्व भाविक व मान्यवर रथामागून पायी मार्गक‘मण करीत होते. सहकारनगर घाटावर धार्मिक विधी झाल्यानंतर पुत्र अजेय देशमुख यांनी मंत्राग्नी दिला. त्यावेळी उपस्थितांना दु:खाचा आवेग आवरणे कठिण होत होते.
'Dharmbhaskar Sadgurudas Maharaj' अन्त्यसंस्कारानंतर झालेल्या शोकसभेत रा. स्व संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. सद्गुरूंना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रा.स्व. संघाचे विदर्भ प्रांत सहसंपर्क प्रमुख प्रशांत दाणी, महानगर कार्यवाह रवींद्र बोकारे, सोमलवाडा भाग संघचालक श्रीकांत चितळे, सोमलवाडा नगर संघचालक अविनाश भुमराळकर, अजनी भाग संघचालक डॉ. रमाकांत कापरे, दक्षिणामूर्ती नगर संघचालक दिनेश वंडलकर, डॉ. स्वानंद पुंड, दुर्ग अतुल गुरू, शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे दत्ता शिर्के, भाजपाचे संजय बंगाले, श्री गुरू मंदिर परिवारातर्फे अरुण कडबे, प्रा. भालचंद्र देशकर, प्रसन्न बारलिंगे, गीता परिवारातर्फे श्रीनिवास वर्णेकर, नागपूरचे माहिती आयुक्तगजानन निमदेव, ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित, प्रमोद काळबांडे, जनआक‘ोशचे रवींद्र कासखेडीकर, वि. सा. संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, डॉ. पिनाक दंदे, नाना महाराज परिवारातर्फे संजय पाठक, शिवप्रतिष्ठानतर्फे प्रसाद काळे, प्रल्हाद महाराज उपासना मंडळातर्फे नितीन कुळकर्णी, नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टतर्फे पराग जोशी, उत्कर्ष मंडळातर्फे अतुल मोहरीर, संस्कार भारतीतर्फे आशुतोष अडोणी, किशोर पवनीकर, गुरुदेव सेवा मंडळातर्फे डॉ. शांतीदास लुंगे यांनी श्रद्धांजली व्यक्तकेली.
प्रचंड मोठ्या शिवकार्यातील एक तारा निखळला
एक शिवसूर्य अस्तंगत झाला. अजरामर ग्रंथाच्या रूपाने म्हणजेच शककर्ते शिवराय व राजा शंभूछत्रपती
ते जनमानसात सदैव प्रज्वलित राहतील, या शब्दात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी शोक संवेदना व्यक्त केली आहे.