संरक्षणाऐवजी विश्वासघात! पोलिसांकडे मदत मागायला गेलेल्या तरुणीसोबत घाणेरडे कृत्य

12 Feb 2026 12:07:48
पुणे, 
pune-budhwar-peth-news पुण्यातील बुधवार पेठ परिसराशी संबंधित एका गंभीर प्रकरणामुळे पोलीस दलाची प्रतिमा धुळीस मिळाल्याची चर्चा सुरू आहे. मदतीसाठी पोलीस ठाण्यात आलेल्या एका बांगलादेशी तरुणीला संरक्षण देण्याऐवजी तिच्याशी गैरप्रकार केल्याचा आरोप एका महिला पोलीस हवालदारावर झाला आहे. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर फरासखाना पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या मनिषा पुकाळेला निलंबित करण्यात आले असून विभागात खळबळ उडाली आहे.
 
pune-budhwar-peth-news
 
माहितीनुसार, सुमारे महिनाभरापूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास ही तरुणी फरासखाना पोलीस ठाण्यात पोहोचली होती. तिच्याकडून जबरदस्तीने देहविक्रय करून घेतला जात असल्याचे सांगत तिने पोलिसांकडे मदतीची याचना केली. नियमानुसार तिला संरक्षण देऊन आवश्यक कायदेशीर प्रक्रिया राबवणे अपेक्षित असताना, संबंधित हवालदारांनी वेगळाच मार्ग अवलंबल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, त्या तरुणीला गुपचूप शुक्रवार पेठ येथील पोलीस चौकीत नेण्यात आले. pune-budhwar-peth-news तेथे कथितरित्या संबंधित कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेची उपस्थिती लावण्यात आली. काही काळ बंद दाराआड चर्चा झाल्यानंतर तरुणीला पुन्हा त्याच ठिकाणी परत पाठवण्यात आल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रकाराची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताच चौकशीचे आदेश देण्यात आले.
प्राथमिक तपासात कर्तव्यच्युती तसेच गंभीर स्वरूपाचे गैरवर्तन झाल्याचे निदर्शनास आल्याने परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी संबंधित महिला हवालदाराच्या निलंबनाचे आदेश दिले. पुढील चौकशी सुरू असून संपूर्ण प्रकरणाची सखोल तपासणी केली जात आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. pune-budhwar-peth-news महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या यंत्रणेतच अशा प्रकारची घटना घडल्याने विविध स्तरांतून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संबंधित कायदे आणि प्रतिबंधक पथके प्रत्यक्षात कितपत प्रभावीपणे कार्यरत आहेत, याबाबतही चर्चा रंगली आहे. पोलिसांनी मात्र दोषींवर कठोर कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
Powered By Sangraha 9.0