घर, लिफ्ट आणि शाळेतही; मुख्याध्यापिकेवर सासऱ्याने सहा वर्ष केला लैगिक छळ

    दिनांक :12-Feb-2026
Total Views |
बंगळुरू, 
father-in-law-sexually-harassed-principal नाती, विश्वास आणि कुटुंबव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी एक गंभीर घटना बंगळुरूमधून समोर आली आहे. समाजात मानाचे स्थान असलेल्या एका शाळेच्या मुख्याध्यापिकेने स्वतःच्या सासऱ्यावर दीर्घकाळ लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणामुळे शैक्षणिक वर्तुळातही खळबळ उडाली आहे.
 
father-in-law-sexually-harassed-principal
 
उत्तर बंगळुरू परिसरात राहणारी ही महिला 2007 पासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून एका नामांकित खासगी शाळेची प्रिन्सिपल आहे. तिच्या तक्रारीनुसार, विवाहानंतरची सुरुवातीची काही वर्षे सुरळीत गेली; मात्र 2020 पासून सासऱ्यांचे वर्तन बदलले. संपूर्ण कुटुंब एकाच अपार्टमेंट संकुलात वेगवेगळ्या घरांत राहत होते. पती बाहेर असताना किंवा ती घरी एकटी असताना सासरे घरात येऊन अयोग्य वर्तन करत असल्याचा आरोप तिने केला आहे. घडणारा प्रकार कुणालाही सांगितल्यास मुलांना इजा पोहोचवू, अशा धमक्या देत आरोपी तिला गप्प बसण्यास भाग पाडत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. मुलांच्या सुरक्षिततेची भीती आणि कुटुंबाची प्रतिमा जपण्याच्या दबावामुळे ती बराच काळ शांत राहिली. father-in-law-sexually-harassed-principal परिस्थिती सुधारेल, अशी अपेक्षा होती; मात्र त्रास वाढतच गेला. अखेर सहनशक्तीचा अंत झाल्यावर तिने सर्व घडामोडी पतीला सांगितल्या. कुटुंबातील ज्येष्ठांनी हस्तक्षेप करून आरोपीला समज दिली, त्यामुळे काही काळ शांतता होती.
तथापि, प्रकरण तिथेच थांबले नाही. सासऱ्यांनी तिच्या कार्यस्थळावरही जाऊन त्रास दिल्याचा आरोप आहे. शाळेतील केबिनमध्ये तसेच अपार्टमेंटमधील लिफ्ट परिसरात अयोग्य वर्तन केल्याचे तिने स्पष्ट केले आहे. शिवाय, हाताने लिहिलेली अश्लील मजकूर असलेली पत्रे देऊन ती वाचण्यास भाग पाडल्याचा आरोपही करण्यात आला आहे. हा प्रकार 2020 पासून डिसेंबर 2025 पर्यंत सुरू होता, असे तिने सांगितले. 15 डिसेंबर 2025 रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना गंभीर वळणावर गेली. कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेचा लिफ्टजवळ पुन्हा छळ करण्याचा प्रयत्न झाला. father-in-law-sexually-harassed-principal तिने विरोध केल्यानंतर आरोपीने तिच्यावर शारीरिक हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर तिने तात्काळ पोलिसांत धाव घेतली.
पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य महिला आयोगानेही दखल घेतली आहे. जबाबदारीच्या पदावर कार्यरत असलेल्या महिलेलाच घरच्या चार भिंतींत सुरक्षितता नसल्याची बाब चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू असून पुढील तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.