पिंपरी,
Pimpri municipal corporation महापौर आणि उपमहापौर निवड झाल्यानंतर आता पिंपरी महापालिकेतील स्थायी समिती आणि स्वीकृत सदस्यपद कोणाला मिळणार, याबाबत राजकीय चर्चा जोर धरली आहे. स्वीकृत सदस्यपदांच्या १० जागांपैकी ७ जागा भाजपला आणि उर्वरित तीन जागा राष्ट्रवादी (अजित पवार) गटाला वाटप होणार आहे.
भाजपकडून या पदांवर अडीच वर्षांच्या कालावधीचे सूत्र लागू केले जाणार असून, पाच वर्षाच्या कार्यकाळात १४ नेत्यांना संधी देण्यात येणार आहे. मात्र, निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना या संधी मिळणार नाही, असे समजते.याबाबत महापालिकेच्या नवीन स्थायी समिती, विषय समित्या सदस्य, स्वीकृत सदस्य आणि सभापती निवडीसंदर्भात बैठक पुण्यातील भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत शहरातील प्रमुख नेतेही उपस्थित होते. त्यांनी स्थानिक पातळीवरील कोअर कमिटीच्या Pimpri municipal corporation बैठकीत विविध विषय समित्या आणि स्थायी समिती सदस्यपदांचे वाटप यासंदर्भात मार्गदर्शन केले.यावर आधारित गुरुवारी महापालिकेत पुढील बैठक होणार असून, त्यात अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते.