मराठी रील स्टार प्रथमेश कदमने केली आत्महत्या ?

12 Feb 2026 12:06:34
मुंबई,
Prathamesh Kadam death, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि रील स्टार म्हणून लोकप्रिय असलेला प्रथमेश कदम याच्या निधनानंतर निर्माण झालेल्या चर्चांना अखेर त्याच्या आईने पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. २६ जानेवारी रोजी प्रथमेशचे आजारपणामुळे निधन झाले. मात्र त्याच्या मृत्यूबाबत सोशल मीडियावर विविध तर्क-वितर्क लावले जात होते. या पार्श्वभूमीवर प्रथमेशची आई प्रतीक्षा कदम यांनी भावनिक व्हिडिओ शेअर करत मुलाच्या निधनाचे खरे कारण स्पष्ट केले आणि अफवा न पसरवण्याची हात जोडून विनंती केली.
 

Prathamesh Kadam death, 
प्रथमेश कदम हा सोशल मीडियावर आईसोबत बनवलेल्या व्हिडिओंमुळे प्रसिद्ध झाला होता. डान्स, रील्स आणि विनोदी आशयाच्या व्हिडिओंमुळे मायलेकांची जोडी नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरली होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून तो आजारी होता. उपचार सुरू असतानाच २६ जानेवारी रोजी त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या मित्रांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही दु:खद बातमी जाहीर केली होती.
 
 
निधनानंतर काही जणांनी आत्महत्येचा संशय व्यक्त करत विविध अफवा पसरवल्या. यामुळे कुटुंबीयांना मानसिक त्रास सहन करावा लागत होता. अखेर प्रथमेशच्या आईने स्वतः पुढे येत सत्य मांडले. “प्रथमेशने आत्महत्या केलेली नाही. त्याला असं काहीही झालं नव्हतं. त्याच्या मृत्यूचं कारण म्हणजे रक्तात मिसळलेली कावीळ. ही पांढरी कावीळ असते आणि ती सहज लक्षात येत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
त्या पुढे म्हणाल्या की, Prathamesh Kadam death,  उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी सुरुवातीला प्रकृती सुधारेल, अशी ग्वाही दिली होती. सर्व रिपोर्ट्स सामान्य असल्याचेही सांगितले गेले. मात्र शेवटच्या टप्प्यावर डॉक्टरांना समजले की कावीळ रक्तात पसरली आहे. “डॉक्टरांनी मला देवाकडे प्रार्थना करा असे सांगितले. त्या क्षणी मी खचून गेले. २६ जानेवारीला सकाळी माझ्या मुलाने या जगाचा निरोप घेतला,” असे सांगताना त्या भावुक झाल्या.अफवांमुळे कुटुंबीयांवर अधिक मानसिक ताण येत असल्याचे त्यांनी नमूद केले. “मी सर्वांना हात जोडून विनंती करते, कोणतीही खोटी अफवा पसरवू नका. काय झाले, कसे झाले याबद्दल मला किंवा माझ्या मुलीला मेसेज करून विचारू नका. गैरसमज दूर करण्यासाठीच हा व्हिडिओ केला,” असे त्यांनी आवाहन केले.प्रथमेशने वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली होती. आईसोबत सोशल मीडियावर सक्रिय राहत त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याच्या अचानक जाण्याने चाहत्यांसह कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आईच्या या भावनिक आवाहनानंतर अनेकांनी कमेंट्सद्वारे त्यांना धीर देत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
Powered By Sangraha 9.0