पुण्यात गुन्हेगारी सत्र सुरूच

12 Feb 2026 15:56:46
पुणे,
Pune crime पुणे स्टेशन परिसरातील एका पबच्या आवारात कारमध्ये झोपलेल्या महाविद्यालयीन तरुणाकडील दीड लाखाची सोनसाखळी तसेच त्याच्या मित्राकडील रोकड चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. तक्रारदार महाविद्यालयीन तरुणाने या चोरीसंदर्भात एका बाउन्सरवर संशय व्यक्त केला आहे.
 

Pune crime, Pune Station theft, college studet robbed 
 
 
याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात अनोळखी बाउन्सर विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार युवक बावधन भागात राहतो. ३१ जानेवारी रोजी महाविद्यालयीन युवक आणि त्याचा मित्र पुणे स्टेशन परिसरातील एका पबमध्ये आले होते. Pune crime त्यानंतर, पबच्या बाहेर त्यांची कार पार्क केली असता, कारमध्ये झोपलेल्या युवकाकडील सोनसाखळी आणि मित्राकडील रोकड चोरीला गेल्याचे समोर आले.पोलिसांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि शेजारील साक्षींनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला लवकरच ओळखून अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
Powered By Sangraha 9.0