पुणे-सातारा महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात

    दिनांक :12-Feb-2026
Total Views |
पुणे,
pune satara highway, पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील किकवी गावाच्या हद्दीत आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास एका खाजगी लक्झरी बसचा अपघात झाला. प्राथमिक माहिती नुसार, बसने पुढे चालत्या ट्रकला मागून धडक दिल्याने हा अपघात घडल्याचे समोर आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे.
 

 pune satara highway, private bus accident 
अपघातानंतर बसचा चालक स्टेरिंग आणि सीटमध्ये अडकलेला होता. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि आपत्कालीन बचाव पथकाच्या कार्यक्षम प्रयत्नांमुळे काही वेळातच त्याला सुरक्षितरीत्या सुटका करण्यात आली. या प्रक्रियेत चालकाला किरकोळ दुखापत झाल्याचे समजते.घटनेनंतर महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिस आणि वाहतूक विभागाच्या तात्काळ कार्यवाहीमुळे बस क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्या कडेला हलवली गेली. त्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.पोलीसांनी अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला असून, महामार्गावर वेग नियंत्रण आणि सुरक्षित अंतर राखण्याचे महत्त्व या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाले आहे.