- चिल्ड वाॅटर खुल्या विक्रीला उच्च न्यायालयाचा नकार
अनिल कांबळे
नागपूर,
Unsealed water is harmful पिण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी सीलबंद कंटेनरमध्ये असणे बंधनकारक आहे. विना सीलबंद पाणी विकण्याची परवानगी दिल्यास ते मानवी आराेग्यासाठी धाेकादायक ठरू शकते, कारण अशा पाण्याचे परीक्षण किंवा तपासणी झालेली नसते. विना सीलबंद पिण्याच्या पाण्याची विक्री करण्याची परवानगी मागणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नाकारली आहे. न्यायमूर्ती अनिल पानसरे आणि न्यायमूर्ती निवेदिता मेहता यांच्यासमक्ष ही सुनावणी झाली.
‘अन्न सुरक्षा आणि मानके नियम, 2011’ मधील कलम 2.10.8 नुसार, पिण्याचे पाणी सीलबंद असावे. याचिकाकर्त्यांची मागणी नियमांच्या विराेधात असल्याने हायकाेर्टाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला आणि याचिका ेटाळली. या निर्णयामुळे आता पिण्याच्या पाण्याची विक्री करणाèया विक्रेत्यांना (बीआयएस) मानकांचे पालन करणे आणि पाणी सीलबंद स्वरूपातच विकणे अनिवार्य झाले आहे. दरम्यान नागपूरमधील ’आर.ओ. चिल्ड वाॅटर मॅन्युफॅक्चरर्स वेल्ेअर असाेसिएशन’ने चिल्ड वाॅटरच्या विक्रीवर प्रशासनाकडून लावण्यात आलेल्या बंदीला याचिकेद्वारे आव्हान दिले हाेते.
Unsealed water is harmful अन्न सुरक्षा आणि मानके नियमावली 2011 मध्ये मार्च 2017 पासून सुधारणा करण्यात आली आहे. यानुसार ’पॅकेज्ड ड्रिंक वाॅटर’साठी विशिष्ट परवाने अनिवार्य आहेत. मात्र, असाेसिएशनचा असा दावा आहे की, माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, केवळ ’पॅकेज्ड ड्रिंकिंग वाॅटर’साठी परवाना आवश्यक आहे, तर जारमधून पुरवल्या जाणाक्तया इतर प्रकारच्या पाण्यासाठी अशा परवान्याची गरज नसल्याचे सांगण्यात आले हाेते. भारतीय मानक ब्युराेने (बीआयएस) स्पष्ट केले आहे की, थंड पाण्याच्या जारसाठी अद्याप काेणतेही भारतीय मानक निश्चित केले नाही, त्यामुळे त्यांना बीआयएस परवाना दिला जाऊ शकत नाही. दरम्यान, याचिकेमध्ये नमूद केले हाेते की, प्रशासकीय अधिकाक्तयांनी चिल्ड वाॅटर तयार करणाक्तया युनिट्सची तपासणी केली आणि अवघ्या 1 ते 3 दिवसांत विक्री थांबवण्याचे आदेश दिले.