प्रेमविवाहानंतर हुंड्यासाठी पत्नीचा छळ : पतीला एका वर्षाची शिक्षा

12 Feb 2026 21:45:24
अनिल कांबळे
 
नागपूर,
Wife harassment for dowry कुटुंबियांच्या विराेधात जाऊन प्रेमविवाह केल्यानंतरही पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून माहेरून पैसे व मालमत्तेत हिस्सा मागणाऱ्या पतीला नागपूर न्यायालयाने दाेषी ठरवून एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ए.डी.बाेस यांनी हा निकाल दिला.


hunda
 
 
Wife harassment for dowry  फिर्यादी दिशा आकाश दुपारे (29, न्यू कैलासनगर, अजनी) आणि आराेपी आकाश आनंदराव दुपारे (29) या दाेघांचे प्रेमसंबंध हाेते. दाेघांनीही प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दिशा यांच्या कुटुंबियांचा प्रेम विवाहास विराेध हाेता. मात्र, दिशाने कुटुंबियांची समजूत घालून आकाशशी प्रेमविवाह केला हाेता. मात्र, लग्नाच्या दाेन वर्षानंतर 6 मे 2020 ते 29 नाेव्हेंबर 2022 या कालावधीत आराेपी आकाशने आपले खरे रूप दाखवण्यास सुरुवात केली. आराेपीने दिशा यांना माहेरून पैसे आणण्यासाठी आणि आई-वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा मागण्यासाठी तगादा लावला. या कारणावरून तिला शिवीगाळ करणे, हातबुक्कीने मारहाण करणे आणि तिचा शारीरिक व मानसिक छळ करणे सुरू केले. शेवटी, छळाला कंटाळून दिशा यांनी अजनी पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. अजनी पाेलिसांनी पतीवर गुन्हा दाखल केला हाेता. तपासाअंती न्यायालयात दाेषाराेपपत्र सादर करण्यात आले. साक्षी-पुराव्यांच्या आधारे गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने आराेपी आकाश दुपारे याला शिक्षा सुनावली. यात 1 वर्ष सश्रम कारावास आणि 5,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 2 महिने अतिरिक्त कारावास आणि 3 महिने सश्रम कारावास आणि 1,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 10 दिवस अतिरिक्त कारावास असा समावेश आहे. या खटल्यात सरकारी पक्षार्ते प्रियंका झिरपे यांनी बाजू मांडली, तर आराेपीर्ते अ‍ॅड. उल्हास दुपारे यांनी काम पाहिले. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पाेलिस हवालदार श्रीरामे यांनी केला हाेता. न्यायालयीन कामकाजात काेर्ट पैरवी अधिकारी म्हणून पाेलिस हवालदार कीर्ती ुकट आणि पाेलिस अंमलदार सुरेंद्र लव्हाणे यांनी सहकार्य केले.
Powered By Sangraha 9.0