हरभर्‍याला मुहूर्ताला ५२५१ रुपयांचा भाव!

    दिनांक :13-Feb-2026
Total Views |
नांदगाव बाजार समितीत जोरदार आवक
 
नांदगाव खंडेश्वर, 
येथील Agricultural Produce Market Committee कृषी उत्पन्न बाजार समितीत आज रब्बी हंगामातील नवीन हरभर्‍याची पहिली आवक दाखल झाली. या मुहूर्ताच्या हरभर्‍याला तब्बल ५२५१ रुपये इतका चांगला भाव मिळाल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. धानोरा मोगल येथील शेतकरी वैभव मुंडवाईक यांनी आपल्या शेतातील नवीन हरभरा आज विक्रीसाठी बाजार समितीत आणला होता. हा शेतमाल सतीश गिड्डे यांच्या अडत दुकानावर विक्रीसाठी आला असता, व्यापारी सचिन लढ्ढा यांनी ५२५१ रुपये असा उच्चांकी भाव देऊन या हरभर्‍याची खरेदी केली.
 
 
harbhara
 
काटा पूजन व शेतकरी सन्मान
Agricultural Produce Market Committee  हंगामाच्या सुरुवातीलाच नवीन मालाची आवक झाल्यामुळे बाजार समितीचे सभापती प्रभात पाटील ढेपे यांच्या हस्ते विधिवत ’काटा पूजन’ करण्यात आले. यावेळी सभापतींनी शेतकरी वैभव मुंडवाईक यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केला व त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळेस बाजार समितीचे संचालक डॉ. राजेंद्र पांडे, प्रमोद ठाकरे, पंकज ठाकरे, विवेक वैष्णव, अडते व्यापारी नंदकिशोर लढ्ढा, सतीश शिरभाते, अक्षय ब्राम्हणवाडे, गजानन गिड्डे, जावेद, बाजार समिती सचिव अ. ज. मोहोड व इतर मंडळी उपस्थित होती.