अजित पवारांचा जीव घेतला शिक्षा तर होणारच...

    दिनांक :13-Feb-2026
Total Views |
मुंबई,
Nana Patekar राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित निधनाबाबत सोशल मीडियावर विविध दावे आणि चर्चांना उधाण आले आहे. मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत शासकीय किंवा कौटुंबिक पुष्टी समोर आलेली नाही. दरम्यान, या पार्श्वभूमीवर अभिनेते नाना पाटेकर यांनी माध्यमांशी बोलताना संयत भूमिका मांडली आहे.
 

Ajit Pawar death rumours, Nana Patekar reaction, 
अजित पवार यांच्या संदर्भात सुरू असलेल्या चर्चांबाबत विचारले असता नाना पाटेकर म्हणाले, “घरातल्या सदस्याला गमावल्यासारखी भावना असेल तर प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. त्यांनी त्यांच्या काकांना गमावलं आहे, त्यामुळे त्यांना जे वाटलं ते त्यांनी बोलून दाखवलं असेल. पण त्यांनी नेमकं काय म्हटलं, याची मला माहिती नाही. त्यामुळे मी त्यावर टिप्पणी करू शकत नाही.”अजित पवार यांच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय व्यक्त केल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना नाना पाटेकर म्हणाले, “कोणी काही केलं असेल तर ते चौकशीत समोर येईल. सत्य बाहेर येईल आणि दोषींना शिक्षा होईल.” त्यांनी या प्रकरणात संयम बाळगण्याचे आवाहन केले.
 
 
नाना पाटेकर यांनी अजित पवार Nana Patekar  यांच्याशी असलेल्या वैयक्तिक नात्याबाबतही भावना व्यक्त केल्या. “अजित पवार मला लहान भावासारखे होते. १९–२० वर्षांचे असल्यापासून आमची ओळख होती. कार्यकर्ता म्हणून काम करत असताना त्यांना पाहिलं आणि पुढे त्यांनी गाठलेलं स्थान मोठं होतं. राजकारण बाजूला ठेवलं तरी मी त्यांना मित्र म्हणून मिस करेन,” असे ते म्हणाले.दरम्यान, रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे चर्चांना अधिक वेग आला आहे. तसेच सुनेत्रा पवार यांनी पदभार स्वीकारल्याबाबत विचारले असता नाना पाटेकर म्हणाले, “त्यांचं दुःख इतरांपेक्षा वेगळं आहे. त्यांनी स्वीकारलेल्या जबाबदारीचं ओझं मोठं आहे. त्या ती जबाबदारी सांभाळतील, पण वेळ लागेल.”
 
 
सोशल मीडियावर विविध दावे आणि अंदाज व्यक्त केले जात असले तरी संबंधित यंत्रणांकडून किंवा कुटुंबीयांकडून अधिकृत माहिती समोर येणे बाकी आहे. त्यामुळे नागरिकांनी अपुष्ट माहितीकडे सावधपणे पाहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.