मोठी बातमी देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश १७ महिलांना सुटका

    दिनांक :13-Feb-2026
Total Views |
आळंदी
Alandi sex racket busted, तीर्थक्षेत्र आळंदी परिसरातील देहू फाटा येथे असलेल्या 'हॉटेल साई पॅलेस'मध्ये सुरू असलेल्या मोठ्या सेक्स रॅकेटचा दिघी पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत १७ पीडित महिलांना सुटका करण्यात आली असून, ६ जणांना अटक करण्यात आली आहे.
 

Alandi sex racket busted, 
पोलिसांनी दिलेल्या Alandi sex racket busted, माहितीनुसार, हॉटेलमध्ये महिलांना पैशांचे आमिष दाखवून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आरोपी महिलांचा गैरफायदा घेत असल्याची गोपनीय माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून हॉटेलवर धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी ५१ हजार ७० रुपये मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी अटक केलेले आरोपी आहेत: कृष्णा सुरेश पाटील (मॅनेजर), राज मोहन शेट्टी (मॅनेजर), संजय अमीन बावरी, साबीर अक्तर अली आणि भरत दत्तात्रय बिराजदार. मात्र, हॉटेलचा मालक अवघुत गाढवे, चालक पद्मलोचन दास आणि विक्रम हिरा वढ हे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत आणि ते अद्याप फरार आहेत.दिघी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई महेश भारत लाडे यांनी फिर्याद दिली असून, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल तपास सुरू आहे. पोलिस आता शोध घेत आहेत की या रॅकेटचे जाळे कुठेपर्यंत पसरले आहे आणि यामध्ये आणखी कोणाचे हितसंबंध आहेत.