एक एकर क्षेत्रातील जलपर्णीवर प्रक्रिया
जलपर्णीपासून लॅपटॉप बॅग्स, योगा मॅट, फोल्डर, लॉन्ड्री बॅग्स
महिलांना मिळाले रोजगाराचे साधन
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केले कौतुक
नागपूर,
Ambazari Lake अंबाझरी तलावाच्या सौंदर्याला बाधा आणणार्या जलपर्णीतून आता अतिशय सुंदर आणि टिकाऊ ’हस्तशिल्प’ साकारले जात ’विड टू वेल्थ’ या संस्थेच्या संस्थापक स्वाती धोटकर यांनी जलपर्णी या समस्येचे रूपांतर संधीमध्ये करून अंबाझरी तलाव प्रदूषण कमी करण्यासोबतच महिलांना आर्थिक बळ देण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे. चंद्रपूरमध्ये स्वतःच्या हिमतीवर हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प यशस्वी केल्यानंतर, स्वाती धोटकर यांनी नागपूर महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत असलेल्या कौशल्य विकास केंद्रात हा उपक्रम राबवला आहे.
शंभर महिलांना प्रशिक्षण
Ambazari Lake मुख्यत: या प्रकल्पांतर्गत आतापर्यंत अंबाझरी तलावातील तब्बल एक एकर क्षेत्रातील जलपर्णी काढून त्यावर प्रक्रिया करण्यात आली. जलपर्णीचे देठ, पाने आणि मुळे वेगळी करून ती उन्हात वाळवली जातात आणि त्यानंतर त्यापासून दर्जेदार हस्तशिल्पांची निर्मिती केली जाते. प्रशिक्षण घेतलेल्या १०० महिलांनी आतापर्यंत ८०० हून अधिक तयार केल्या आहेत. यामध्ये लॅपटॉप बॅग्स, लेदर बॅग्स, योगा मॅट, सुबक पर्स, फाईल फोल्डर आणि लॉन्ड्री बॅग्स यांसारख्या विविध उपयोगी समावेश आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर आणि नागपूर वगळता असा अभिनव प्रकल्प देशात अन्य कोठेही पाहायला मिळत नाही.