वार्षिक स्नेहसंमेलनात चिमुकल्यांच्या कलाविष्काराने प्रेक्षक मंत्रमुग्ध

13 Feb 2026 17:32:11
बाभुळगाव जि. प. शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात

बाभुळगाव, 
Babhulgaon ZP Higher Primary School  जिप उच्च प्राथमिक मराठी व सेमी इंग्रजी शाळेतील तीनदिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक‘माचे उद्घाटन गटविकास अधिकारी ढोले यांच्याहस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी बालाजी संस्थेचे अध्यक्ष डॉ. रिकबचंद तातेड, प्रमुख पाहुणे खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष श्रीकांत कापसे, माजी सभापती प्रकाशचंद छाजेड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सतीश मानलवार, नगर पंचायतचे उपाध्यक्ष श्याम जगताप, प्रदीप नांदुरकर, नगरसेवक अनिकेत पोहोकार, नगर सेवक अभय तातेड, नगर पंचायच्या मुख्याधिकारी डॉ प‘वी सोटे, सेवक अक्षय राऊत, नगरसेवक अमर सिरसाठ, हेमलता काळे, शाळा समितीचे अध्यक्ष अंकुश सोयाम, पोलिस पाटील मुकुंद काशेट्टीवार, समाजसेवक संजय खोडे, मु‘याध्यापक विद्या काशेट्टीवार, उर्दू शाळा समितीचे अध्यक्ष शे. जावेद राज, उर्दू शाळेचे मु‘याध्यापक इकराम, हेमंत बोरकर, प्रेस क्लबचे अध्यक्ष अरिफ अली, प्रवीण लांजेकर, विक‘म बर्‍हाणपुरे, शाखा अभियंता अपर्णा डोणेकर, अधिकारी निमकर, अजमत मुल्ला उपस्थित होते.
 
 
shala
 
Babhulgaon ZP Higher Primary School या शाळेची स्थापना १८६२ साली करण्यात आली होती. त्यात आता बरेच बदल झाले असून शाळा व्यवस्थापन समितीच्या नियंत्रणात शाळेत नर्सरी, केजी १, केजी २ चे वर्ग असून जि. पं. चे वर्ग १ ते वर्ग ८ पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत असून शहरी भागातील खाजगी स्पर्धा करावी लागत असतांना आपल्या जि प. शाळेने शिक्षणाचा दर्जा कायम ठेवून पटसं‘या दरवर्षीच वाढवली आहे. सोबतच महादीप व स्कॉलरशिप परीक्षेत या शाळेतील विद्यार्थी जिल्हास्तराव उत्तीर्ण झाल्याची माहिती आपल्या प्रास्तविकामध्ये जेष्ठ शिक्षक प्रशांत भुराने यांनी दिली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात कार्यक‘माचे संचालन वैशाली बोरकर यांनी केले. कार्यक‘मासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश सोयाम, उपाध्यक्ष लता सौसाकडे, सदस्य शशिकांत थोटे, प्रवीण चेंडाकपुरे, अमीन खान, निखिल तातेड, कांता सहारे, तृप्ती गुंडारे, हिना सलीमशेख, शिक्षक संतोष लिचडे, राजेश गोसावी, श्यााम लोखंडे, ममता बिंनोड, प्रगती चिंचे, संध्या लांडे, सुनीता जयसिंगपुरे, समितीचे सर्व सदस्य शिक्षकांनी परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0