हव्याप्रमंची ‘भानगड’ राज्यस्तरावर चमकली

    दिनांक :13-Feb-2026
Total Views |
स्पर्धेतील प्राथमिक फेरीत तृतीय
 
अमरावती, 
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा वारसा जोपासत संस्थेचे अभियांत्रिकी महाविद्यालय उच्च तंत्रशिक्षण क्षेत्रात आपल्या आगळ्यावेगळ्या शैक्षणिक उपक्रमातून चर्चेत असते. याच अभियांत्रिकी महाविद्यालयाने राज्यस्तरीय स्पर्धेत सादर केलेली ‘Bhangad’ one-act play ‘भानगड’ ही एकांकिका प्राथमिक फेरीत तिसर्‍या तिसर्‍या क्रमांकावर यशस्वी ठरली असून महाअंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
 
 
bhangad
 
गावातील सात नराधमांनी एका मुकी असलेल्या मुलीवर अत्याचार केले. प्रकरणास वाचा फोडली तर जीवावर बेतेल अशी धमकी सुद्धा तिला दिली. समाज काय म्हणेल, आपल्या भवितव्याचे कसे होईल, या प्रश्नाने ती चिंतेत असतांना झालेल्या अत्याचारामुळे तिचा आक्रोश मनामध्ये धगधगत होता. बोलता येत नसल्याने तिची वेदना कोणाला कळत नव्हती; मात्र एका शिक्षकाने ती वेदना हेरली आणि तिच्या मूक वेदनेला समाजस्तरावर वाचा फोडली, हे सांगणारी या एकांकिका आहे. हव्याप्र मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास कक्षाचे प्रमुख प्रा. शुभम ठाकरे दिग्दर्शित व प्रा. प्रवीण पाटेकर लिखित ‘भानगड’ एकांकिका राज्यस्तरीय स्पर्धेत सादर करण्यात आली.
 
 
दर्जेदार पटकथा, उत्कृष्ट अभिनयाने ‘Bhangad’ one-act play  ‘भानगड’ ने प्राथमिक फेरीतून तृतीय क्रमांक पटकावून महाअंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये वैयक्तिक पारितोषिकामध्ये निर्मिती तृतीय, दिग्दर्शन द्वितीय, संगीत प्रथम, रंगभूषा द्वितीय, प्रकाशयोजना द्वितीय या सोबतच एकूण ७५ हजाराचे रोख पारितोषिके पटकावले. सोबतच नुकताच पार पडलेल्या रायसोनी करंडक राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन स्पर्धेच्या महाअंतिम फेरीमध्ये या एकांकिकेने मजल मारून तब्बल ३ पारितोषिकासह चतुर्थ क्रमांकाचे ३० हजाराचे पारितोषिक व सन्मानपत्र पटकावले. वैयक्तिक पारितोषिकांमध्ये स्त्री अभिनय द्वितीय, प्रकाशयोजना प्रथम, नैपथ्य द्वितीय, निर्मिती उत्साहानपर पहिले पारितोषिक पटकावले. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे इंडस्ट्री रिलेशन अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. प्रणव चेंडके यांच्या कला, साहित्य क्षेत्रातील पुढाकाराने अभियांत्रिकी महाविद्यालयाने साहित्य क्षेत्रामध्ये भरारी घेतली असून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस दाळू यांनी एकांकिकेमध्ये सहभागी विद्यार्थी प्रणव कोरे, श्रेयस सरडे, निखिल सखे, निशांत जामनिक, ऋषी भंडारकर, आदित्य ढोरे, लोकेश बोदरकर, सुयश तामखाने, गायत्री चतारकर यांचेसह सर्व चमूचे अभिनंदन केले.