3 हजारांची लाच घेणाऱ्या महसूल सहाय्यकाला अटक

13 Feb 2026 21:46:13
- सातबारा दुरुस्तीसाठीकेली हाेती लाचेची मागणी

अनिल कांबळे
नागपूर, 
सातबारा उताऱ्यावर नाव दुरुस्ती व नाव कमी करण्यासाठी 3 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या बेला (ता. उमरेड) येथील महसूल सहाय्यकाला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी केली. विजय भगवानजी शेडमाके असे Bribery लाचखाेर महसूल सहाय्यकाचे नाव आहे.
 

lacha 
 
तक्रारदाराने त्यांच्या व नातेवाईकांच्या नावामध्ये सातबारा उताऱ्यावर दुरुस्ती करण्यासाठी तसेच आईचे नाव कमी करण्यासाठी अपर तहसील कार्यालय, बेला येथे अर्ज केला हाेता. संबंधित कामासाठी महसूल सहाय्यक विजय भगवानजी शेडमाके यांनी सुरुवातीला 4 हजार रुपयांची मागणी केली. तडजाेडीनंतर 3 हजार रुपये देण्याचे ठरले. त्यापैकी 2 हजार रुपये आधीच स्वीकारण्यात आले हाेते, तर उर्वरित 1 हजार रुपये नंतर देण्यास सांगण्यात आले. तक्रारदाराने याची तक्रार नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नाेंदवली. पडताळणीदरम्यान आराेपीने पूर्वी घेतलेल्या 2 हजार रुपयांचा उल्लेख करून उर्वरित लाचेचे 1 हजार रुपये शुक्रवारी स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार भ्रष्टाचार विराेधी पथकाने शुक्रवारी दुपारी बेला येथे सापळा रचला. दरम्यान आराेपी शेडमाकेने तक्रारदाराकडून 1 हजार रुपयांची लाच स्वीकारताच त्याला झडप घालून पकडण्यात आले. Bribery या प्रकरणी बेला पाेलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करुन आराेपीस अटक करण्यात आली. ही कारवाई अँटी करप्शन ब्यूराे नागपूर येथील पाेलीस अधीक्षक डाॅ.दिगंबर प्रधान, अपर पाेलिस अधीक्षक माधुरी बाविस्कर व विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पाेलिस उपअधीक्षक महेश काेंडावार यांच्या मार्गदर्शनात पाेलिस निरीक्षक मयूर चाैरसीया व त्यांच्या पथकाने केली.
Powered By Sangraha 9.0