चाकण
Pune bus fire पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक वसाहतीत आज दुपारी धक्कादायक घटना घडली. निगडीहून महाळुंगे एमआयडीसीकडे जाणारी पीएमपीएलची इलेक्ट्रिक बस महिंद्रा कंपनीसमोर अचानक पेट लागून जळून खाक झाली. बसमध्ये सुमारे ५० प्रवासी प्रवास करत होते; मात्र चालक व वाहकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवाशांना वेळेत बाहेर काढण्यात आले आणि मोठी जीवितहानी टळली.
प्राथमिक माहितीनुसार,Pune bus fire शॉर्ट सर्किटमुळे बस अचानक पेटावली. ही बस महाळुंगे एमआयडीसी परिसरातील कामगारांसाठी सुरू केलेली विशेष सेवा होती. घटनेच्या वेळी बस चाकण औद्योगिक वसाहतीतील महिंद्रा कंपनीसमोरून जात असताना अचानक धूर निघू लागला आणि काही क्षणांतच बसच्या मागील भागातून ज्वाळा उसळू लागल्या.चालकाने तत्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवून प्रवाशांना खाली उतरवण्यास सुरुवात केली. प्रवाशांनीही संयम राखत बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. काही प्रवाशांना किरकोळ धूर लागल्याची तक्रार आल्याचे समजते; मात्र कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच Pune bus fire अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी तातडीने प्रयत्न केले. काही वेळात आग नियंत्रणात आली; मात्र तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती.प्राथमिक तपासानुसार ही बस इलेक्ट्रिक असून, बॅटरी यंत्रणेत बिघाड किंवा शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र अधिकृत कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून, औद्योगिक वसाहतीतील कामगारांची मोठी वर्दळ लक्षात घेतल्यास ही घटना अधिक गंभीर ठरू शकली असती.तज्ज्ञांच्या मते, चालक व वाहकाने वेळीच घेतलेला निर्णय आणि प्रवाशांचा संयम यामुळे या धक्कादायक घटनेत जीवितहानी टळली, जे प्रेरणादायी उदाहरण ठरू शकते.