दक्षिणेत जान्हवी कपूरची घोडदौड

तमिळ वेब सिरीजसाठी २० कोटींचे मानधन

    दिनांक :13-Feb-2026
Total Views |
मुंबई,
Janhvi Kapoor, बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिची दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. हिंदी चित्रपटांमध्ये आपली ओळख निर्माण केल्यानंतर जान्हवीने आता तेलुगू आणि तमिळ चित्रपटसृष्टीत ठसा उमटवण्याचा निर्धार केला आहे. अलीकडेच ती “सनी संस्कार की तुलसी कुमारी” या चित्रपटात झळकली होती, तर आता ती राम चरण यांच्या आगामी “पेड्डी” या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.
 


Janhvi Kapoor,  
दक्षिणेतील मोठ्या बॅनरच्या Janhvi Kapoor, चित्रपटांमध्ये काम करत असताना जान्हवीच्या मानधनातही लक्षणीय वाढ झाल्याचे बोलले जात आहे. वृत्तांनुसार, “पेड्डी” या चित्रपटासाठी तिने सुमारे १४ कोटी रुपयांचे मानधन स्वीकारले असून, त्यामुळे ती सर्वाधिक मानधन घेणाऱ्या तेलुगू अभिनेत्रींमध्ये गणली जात आहे. २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या “देवरा” या चित्रपटाची ऑफर मिळाल्यानंतर दक्षिणेत तिच्या लोकप्रियतेला अधिक चालना मिळाली. सुरुवातीला या चित्रपटामुळे आपल्या हिंदी कारकिर्दीवर परिणाम होईल या भीतीने तिने ऑफर नाकारल्याचे समजते; मात्र नंतर तिने होकार देत मोठ्या फीवर हा प्रकल्प स्वीकारला.
 
 
 
चित्रपटांबरोबरच आता जान्हवी ओटीटी विश्वातही पाऊल टाकत आहे. बॉलीवूड हंगामाच्या अहवालानुसार, तिने Netflix या ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी एका तमिळ वेब सिरीजमध्ये काम करण्याचे मान्य केले आहे. ही महिला-केंद्रित कथा असून तिचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक पा. रणजीत करणार आहेत. रणजीत यांनी यापूर्वी सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत “कबाली” आणि “काला” यांसारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्यामुळे या नव्या सिरीजबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.या वेब सिरीजसाठी जान्हवीने तब्बल २० कोटी रुपयांचे मानधन घेतल्याची चर्चा रंगली आहे. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत वाढती मागणी आणि मजबूत कथानक असलेल्या प्रकल्पांची निवड यामुळे जान्हवीचा करिअर ग्राफ वेगाने उंचावताना दिसत आहे. तमिळ चित्रपटसृष्टीत स्वतःला स्थिरावण्यासाठी ती सातत्याने प्रयत्न करत असून, आगामी काळात तिचे आणखी काही मोठे प्रकल्प जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दक्षिण आणि हिंदी या दोन्ही चित्रपटसृष्टीत समांतरपणे काम करत जान्हवी कपूरने स्वतःसाठी वेगळी ओळख निर्माण केली आहे. मोठ्या बॅनरचे चित्रपट, नामांकित दिग्दर्शक आणि ओटीटीवरील दमदार प्रकल्प यामुळे तिच्या कारकिर्दीचा नवा अध्याय सुरू झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.