शिकारीच्या उद्देशाने सापळा लावल्याचा अंदाज
अचलपूर,
तालुक्यातील निजामपूर गावा लगत वाहणार्या सापन नदी पात्रातील झुडपात एक मादी leopard is dead. बिबट मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली. वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी लावलेल्या विद्युत तारा तोंडात अडकल्याने बिबट्यचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
leopard is dead. माहितीनुसार, निजामपूर गावा नजीक वाहणार्या सापन नदी पात्रात आज सकाळी बिबट मृतावस्थेत नागरिकांना आढळले. त्यांनी लगेच पोलिस पाटील व वनविभागाला माहिती दिली. सरमसपुरा पोलिस व वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल होत पंचनामा करण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार, झुडूपात सायल किंवा ससा पकडण्यासाठी बारीक ताराचा विद्युत प्रवाह सोडलेला सापळा लावला होता. त्या सापळ्यात अडकूनच बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. ज्यांनी कोणी हा सापळला लावला त्याचा वन्य प्राण्याची शिकार करण्याचा डाव होता. दरम्यान शिकार्याला सापळ्यात सायल किवा इतर प्राणी न दिसता चक्क बिबट दिसून आल्याने त्याने घटनास्थळावरून विद्युत तार काढून पोबारा केल्याची चर्चा आहे. पोलिस बंदोबस्त व वनविभाग अधिकार्यांच्या उपस्थितीत पंचनामा व शवविच्छेदन करण्यात आले आहे.