माता रमाई जयंतीनिमित्त अनाथ मुलीव शालेय विद्यार्थ्यांना मदतीचा हात

    दिनांक :13-Feb-2026
Total Views |
हदगाव, 
‘ज्ञानसूर्याची सावली, कोट्यवधी लेकरांची माऊली’ अशा शब्दांत गौरविल्या जाणार्‍या त्यागमूर्ती Mata Ramai Jayanti माता रमाईबाई भीमराव आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीचे औचित्य आणि भारतीय जनता पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. किशोर देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा नेते डॉ. भगवान निळे यांच्या पुढाकारातून हदगाव तालुक्यात समाजोपयोगी उपक‘म राबवण्यात आला.
 
 
ramai
 
Mata Ramai Jayanti  डॉ. भगवान निळे यांच्या आयोजनातून प्रथम डोंगरगाव येथे वास्तव्यास असलेल्या छाया, दगडूबाई व अर्चना या तीन अनाथ मुलींना कपडे व किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. यानंतर चोरंबा, कुसळवाडी, खरबी व केदारनाथ येथील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिल, शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गोलू पाटील, भाजपा युवा अध्यक्ष शेषराव मुलगिर, बळवंत मस्के, सच्चिदानंद महाजन, ज्ञानेश्वर दांडेगावकर, ज्ञानेश्वर मस्के, भगवान खांजोडे, कोडंब खूपसे, नारायण गावंडे, सरपंच नरवाडे, बालाजी खांजोडे, गंगाधर मस्के, डॉ. वाघमोडे, सरपंच कैलास वाघमोडे, गजानन झुरोळे, भारत घुन्नर, बबन कांबळे, नितीन निळे, राजेश मुलगिर, उमेश डोंगरदिवे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.