कला संस्कृतीचे दर्शन घडवणार्‍या उपक्रमांना प्रोत्साहन द्या : विजय वडेट्टीवार

    दिनांक :13-Feb-2026
Total Views |
नृत्य स्पर्धा व रक्तदान शिबिराला उत्फूर्त प्रतिसाद
स्वरधारा ग्रुपचे आयोजन

मारेगाव, 
विदर्भातील ग्रामीण भागात कला संस्कृतीचे दर्शन घडते. यामुळे विदर्भातील कला संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी जोपासणार्‍या उपक्रमांना प्रोत्साहन देणे आहे. विदर्भातील कला संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी अशा नृत्य स्पर्धा होणे आवश्यक असून ग्रामीण कलावंतांना आपला कलाविष्कार सादर करून मोठा कलावंत होण्याची व यात आपले भविष्य उज्वल करण्याची मोठी संधी मिळू शकते, असे प्रतिपादन काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे MLA Vijay Vadettiwar आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.
 
 
MLA Vijay Vadettiwar
 
मारेगाव येथे स्वरधारा ग्रुपद्वारा विदर्भस्तर भव्य नृत्य स्पर्धा व रीलस्टार कलावंताचा सत्कार व भव्य रक्तदान शिबिर या कार्यक‘माच्या उद्घाटनप्रसंगी आ. वडेट्टीवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, काँग्रेस पार्टी शेतकर्‍यांच्या पाठीशी असून मी शेतकरी बांधवांच्या हिताच्या प्रश्नासाठी सदैव लढत राहणार. या दोन दिवसीय कार्यक‘माचे उद्घाटन MLA Vijay Vadettiwar आमदार विजय वडेट्टीवार यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष शिवसेना गटाचे संपर्कप्रमुख विजय चोरडिया होते.
 
 
न.प. अध्यक्ष डॉ. मनीष मस्की, शेतकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील ठाकरे, कृउ बाजार समिती सभापती गौरीशंकर खुराणा, वसंत जिनिंगचे माजी सभापती आशिष खुलसंगे, सामाजिक कार्यकर्ते जम्मू यांची मंचावर उपस्थिती होती. यावेळी रिलस्टार साधा माणूस विलास झट्टे, तन्मय सरोदे, आदित्य शिंदे, कार्तिक नेहारे, योगेश नितीन मुंजेकर, रौनक बदखल यांचा मान्यवरांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. स्वरधारा ग्रुपचे अध्यक्ष नागेश रायपूरे, कार्याध्यक्ष अशोक कोरडे, उपाध्यक्ष विवेक बोबडे, सचिव राजेश घुमे, विशाल किन्हेकर, उमर शरीफ, आकाश बदकी, ज्योतिबा पोटे, शेख इफ्तेखार, निखिल कोरडे, आशिष येरणे, दिलदार शेख, लाभेश खाडे, सागर लोणारे, यांनी परिश्रम घेतले. कार्यक‘माचे प्रा. सतीश पांडे यांनी, तर आभार अशोक कोरडे यांनी मानले.