परप्रांतीय तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

13 Feb 2026 12:35:14
पुणे,
Koregaon Bhima murder, पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील ‘आपलं घर हॉटेल’च्या मागे एका परप्रांतीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेत मृतक तरुणाचे नाव सुकेन महातो (रा. ओडिशा) आहे. शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली असून, हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
 

Koregaon Bhima murder,  
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावर सुकेन महातोचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. मृतक हा मूळचा ओडिशाचा रहिवासी असून कामाच्या निमित्ताने पुण्यात वास्तव्यास होता. पोलिस तपास करत आहेत की ही हत्या जुन्या वादातून झाली की अन्य कोणत्यातरी कारणामुळे, तसेच आरोपींना ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेतली जात आहे.
 
 
घटनेची गंभीरता ओळखून शिरूर येथील फॉरेन्सिक विभागालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत. आरोपींच्या शोधासाठी चार पथके तयार केली गेली असून, पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी सांगितले की, पथक तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या मदतीने आरोपींचा माग घेत आहे.
 
 
या घटनेनंतर Koregaon Bhima murder,  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट करत गुन्हेगारांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. बॅनर्जी म्हणाल्या, “महाराष्ट्रातील पुण्यात पुरुलियातील बंदवान येथील २४ वर्षीय स्थलांतरित कामगार सुखेन महातो यांच्या क्रूर हत्येने मला हादरवले आहे. हा द्वेषपूर्ण गुन्हा आहे. भाषेच्या आणि प्रादेशिक ओळखीच्या कारणामुळे त्याला लक्ष्य करून त्याचा छळ करण्यात आला. त्याची हत्या करण्यात आली. सुखेनच्या कुटुंबाला मी सांगते की, या दुःखाच्या वेळी बंगाल तुमच्यासोबत उभा आहे. तरुणाला न्याय मिळवून देण्यासाठी कोणतेही प्रयत्न सोडले जाणार नाहीत.”
शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळावरील तपासात सतत गती घेतली असून, आरोपींचा शोध लवकरच लागेल, असे अधिकारी म्हणाले.
Powered By Sangraha 9.0