मुंबई,
Rakhi Sawant Bigg Boss Marathi entry छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो Bigg Boss Marathi सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अभिनेत्री राखी सावंत हिच्या एंट्रीनंतर घरातील वातावरण पूर्णपणे बदलल्याचे चित्र दिसत आहे. तिच्या आगमनापासून घरात सतत वाद, टोलेबाजी आणि नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. या सगळ्यात घरातील ‘तोफ’ म्हणून ओळखली जाणारी रुचिता जामदारही राखीसमोर काहीशी शांत झाल्याचे नव्या प्रोमोमधून स्पष्ट झाले आहे.
वाहिनीने नुकताच आजच्या भागाचा प्रोमो प्रसिद्ध केला असून त्यात राखी आणि रुचिता यांच्यात जोरदार वाद रंगताना दिसतो. प्रोमोच्या सुरुवातीलाच राखी रुचिताला उद्देशून, “एका शोसाठी तू तुझी लेव्हल पाडलीस रे!” असा टोला लगावते. एवढ्यावरच न थांबता ती रुचिताकडे पाहत “आ..थू! शेम्बडी!” अशा शब्दांत तिला हिणवते. यावर रुचिता शांत न बसता “तुझीही लेव्हल दिसतेय,” असे प्रत्युत्तर देत तिला थेट चॅलेंज देते. “तुझ्यामध्ये दम असेल तर मैदानात ये. तुला एका हातानेच पछाडते बघ! पण तुझ्यात इतका दम नाहीये,” असे म्हणत ती राखीला उघड आव्हान देते.
तथापि, पुढे राखीने Rakhi Sawant Bigg Boss Marathi entry सुरू केलेल्या नाट्यमय रणनितीसमोर रुचिता काहीशी गप्प झाल्याचे दिसते. राखी रुचिताला चिडवण्यासाठी विशालचा उल्लेख करत भावनिक ड्रामा करताना दिसते. “हे विशाल… मी तुझ्याशिवाय जगूच शकणार नाही रे! मला तू हवा आहेस. मी एकटी नल्ली आहे रे! मी एकटी खेळूच शकत नाही. मला प्रेम पाहिजे रे विशाल. मला ट्रॉफी नकोय रे,” असे म्हणत राखीने परिस्थितीला वेगळे वळण दिले. या अनपेक्षित भूमिकेमुळे रुचिता काही काळ स्तब्ध झाल्याचे प्रोमोमध्ये दिसते.
दरम्यान, कालच्या भागात रुचिताने विशालबद्दलच्या आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त केल्या होत्या. तिच्या आयुष्यात विशालचे स्थान किती महत्त्वाचे आहे, हे तिने स्वतःच्या शब्दांत सांगितले होते. त्यामुळेच राखीने आजच्या वादात हाच मुद्दा पकडून रुचिताची खिल्ली उडवल्याचे स्पष्ट झाले आहे.राखीच्या धडाकेबाज शैलीमुळे घरातील समीकरणे बदलताना दिसत आहेत. नेहमीच ठाम आणि आक्रमक भूमिकेत दिसणारी रुचिता या वेळी राखीच्या डावपेचांसमोर काहीशी शांत उभी राहिल्याचे चित्र आहे. आजच्या भागात या वादाचा शेवट नेमका कसा होतो आणि घरातील इतर सदस्यांची भूमिका काय असते, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.