एकात्मिक शेती पद्धतीमध्ये पूरक व्यवसाय करून शेतकर्‍यांनी आर्थिक विकास साधावा : कुलगुरू डॉ. शरद गडाख

13 Feb 2026 17:53:26
उमरखेड, 
शेतकरी हा सतत आपल्या अनुभवाच्या आधारे शेतीत नवनवीन प्रयोग करणारा संशोधकच असतो. शेतकर्‍यांनी स्वतःच्या अनुभवातून आत्मसात केलेल्या तंत्रज्ञानावर त्यांचा ठाम विश्वास असतो. शेतकरी व शेती समृद्ध व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्रातील नामवंत प्रगतशील शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ, कृषी उद्योजक, शेतीवर लिखाण करणारे प्रसार प्रतिनिधी व कृषी विस्तारक एकत्र येऊन आपल्या शेतात यशस्वीरित्या वापरलेले तंत्रज्ञान व अनुभव एकमेकांशी सामायिक करतात आणि त्याचा लाभ सर्वच शेतकर्‍यांना व्हावा, या हेतूने आयोजित ही कार्यशाळा सर्व शेतकर्‍यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. एकात्मिक शेती पद्धतीत शेतकर्‍यांना मालाचा भाव ठरवता येतो. धान्यावर प्रकि‘या करून शेतकरी बाजारपेठ तयार करून आपली आर्थिक साधू शकतो, असे मत कार्यक‘माचे उद्घाटक डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे 'Vice Chancellor Dr. Sharad Gadakh' कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी व्यक्त केले.
 
 
gadakh
 
'Vice Chancellor Dr. Sharad Gadakh'  लोकनेते, सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब माने यांच्या स्मृतिदिनानिमित्त २४ वर्षांपासून दरवर्षी जानेवारी महिन्यात ही कृषी कार्यशाळा व कृषी गौरव पुरस्कार सोहळा सातत्याने आयोजित करण्यात येत आहे. यावेळी डॉ. महेंद्र ढवळे, पांडुरंग आवाड, राठी, सुरेंद्र नारखेडे, दिशा उदगिरकर, श्रीपत राठोड, अंकिता मोरे, मिलिंद देशमुख, मनोज माळी, रविंद्र मेटकर या शेतकर्‍यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार नागेश आष्टीकर, आमदार किसन वानखेडे, माजी आमदार नामदेव ससाने, डॉ. भारत बास्टेवाड, गणेश शिन्दे, शिवराम घोडके, अनिरुद्ध पाटील चोंढीकर, नितिन भुतडा, डॉ. विजय माने, ढगे, डॉ. लक्ष्मीकांत कलंत्री, विजय मुकाडे, डॉ. नितिन कोष्टी शास्त्रज्ञ, डॉ. श्रीकांत अमरशेट्टीवार, डॉ. संदीप कदम वासुदेव चांदुरकर, मयुर ढोले, प्रतिष्ठान चे अध्यक्ष अशोक वानखेडे, बाबुराव पाथ‘डकर, तातू देशमुख, राम देवसरकर उपस्थित होते. कार्यक‘माचे सूत्रसंचालन सुनील वानखेडे यांनी केले, तर उद्धव गायकवाड यांनी आभार मानले.

ही परिषद म्हणजे केवळ भाषण आणि सत्कार या पुरतेच मर्यादित नसून, येथे ज्ञान- अनुभव - कौशल्य आणि तंत्रज्ञानाचे देवाण घेवाण करून करार घडवणारे व्यासपीठ आहे.
- डॉ. विजय माने
चेअरमन, कृषी महाविद्यालय, उमरखेड
Powered By Sangraha 9.0