नागपूर ,
Pandit Bachchraj Vyas School जागतिकीकरणाच्या युगात विविध देशांच्या भाषा व संस्कृती जाणून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणे महत्त्वाचे ठरते. मेडिकल राजाबाक्षा येथील पंडित बच्छराज व्यास इंग्रजी माध्यम शाळा येथे जर्मनीहून आलेल्या विद्यार्थी योहनीस वाघनेर यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली.
या शाळेत जर्मन भाषा ऐच्छिक विषय म्हणून शिकवली जाते. भारताची संस्कृती अभ्यासण्यासाठी आलेल्या योहनीस यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत जर्मनी येथील संस्कृती, सण-समारंभ, खाद्यपदार्थ, खेळ, तसेच तेथील लेखक, कवी आणि विविध वनस्पती यांची माहिती दिली. Pandit Bachchraj Vyas School वर्ग ६ व ७ च्या विद्यार्थ्यांनी जर्मन भाषेत प्रश्न विचारत संवाद साधला. प्रत्यक्ष जर्मन भाषेत संभाषण करण्याचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी आनंददायी ठरला. या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये जर्मन भाषेविषयी अधिक उत्सुकता निर्माण झाली. कार्यक्रमाचे संचालन अंजली गहुकर यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक अनिरुद्ध टेंभेकर, जर्मन शिक्षिका राजश्री पेशकर तसेच रचना पत्की, रुचिरा गोरे, श्रेया मारोडकर आणि सुमिता बराई आदी शिक्षक उपस्थित होते.
सौजन्य: रोहिणी जोशी, संपर्क मित्र