‘लल्ला अँथम – अ वॉर्निंग फ्रॉम सूबेदार’ने वाढवला क्रिकेटचा जल्लोष

14 Feb 2026 11:46:04
मुंबई
Lalla Anthem अनिल कपूर आणि राधिका मदन अभिनित ‘लल्ला अँथम – अ वॉर्निंग फ्रॉम सूबेदार’ हे जोशपूर्ण गाणे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या हाय-एनर्जी अँथममध्ये भारताचे माजी क्रिकेटपटू Harbhajan Singh विशेष उपस्थितीत झळकले असून ‘भारत आर्मी’ आणि Shefali Bagga यांचीही प्रभावी झलक म्युझिक व्हिडिओत पाहायला मिळते.
 

Lalla Anthem A Warning from Subedaar, 
रोहन-विनायक यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याचे गीतलेखन ऋषी उपाध्याय यांनी केले आहे, तर प्रसिद्ध गायक Vishal Dadlani यांनी आपल्या दमदार आवाजात हे अँथम सादर केले आहे. संपूर्ण देश टीम इंडियाला पाठिंबा देत असताना Amazon Prime Video ने या अँथमच्या माध्यमातून चाहत्यांचा उत्साह आणखी वाढवला आहे. हा ट्रॅक आगामी अ‍ॅक्शन-ड्रामा चित्रपट ‘सूबेदार’मधील ‘लल्ला’ या मूळ गाण्यावर आधारित आहे.
 
‘सूबेदार’ या चित्रपटात अर्जुन मौर्य (अनिल कपूर) या व्यक्तिरेखेचा प्रेरणादायी प्रवास उलगडणार आहे. ग्रामीण भारताच्या पार्श्वभूमीवर आधारित या कथेत शिस्त, सन्मान आणि कर्तव्यनिष्ठा यांचा ठसा ठळकपणे उमटतो. जागतिक स्पर्धांच्या काळात प्रत्येक भारतीयाच्या मनात जागृत होणाऱ्या देशभक्तीच्या भावना या अँथममधून प्रभावीपणे व्यक्त होताना दिसतात.
या म्युझिक व्हिडिओत स्टेडियममधील जल्लोष आणि सिनेमॅटिक तीव्रतेचा सुरेख मिलाफ साधण्यात आला आहे. हरभजन सिंह यांच्यासह अनिल कपूर आणि राधिका मदान यांची उपस्थिती गाण्याला अधिक आकर्षक बनवते. ‘भारत आर्मी’च्या सहभागामुळे राष्ट्रीय अभिमानाची ठळक झलक दिसून येते.अनिल कपूर यांनी या गाण्याबद्दल बोलताना सांगितले की, “‘सूबेदार’ ही कर्तव्य आणि अंतर्मनातील ज्वाळेची कथा आहे. ‘लल्ला अँथम’ त्या ज्वाळेचे प्रतिबिंब आहे.” हरभजन सिंह यांनीही या प्रकल्पाचा भाग होणे हा विशेष अनुभव असल्याचे नमूद केले.या चित्रपटाचे दिग्दर्शन Suresh Triveni यांनी केले असून, त्यांनी यापूर्वी Tumhari Sulu आणि Jalsa सारख्या चित्रपटांतून आपली वेगळी शैली सिद्ध केली आहे. चित्रपटाची निर्मिती विक्रम मल्होत्रा, अनिल कपूर आणि सुरेश त्रिवेणी यांनी केली आहे.
‘सूबेदार’ हा चित्रपट ५ मार्च रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार असून भारतासह २४० हून अधिक देशांमध्ये हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. ‘लल्ला अँथम – अ वॉर्निंग फ्रॉम सूबेदार’मुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
Powered By Sangraha 9.0