अनिल कांबळे
नागपूर,
Lakadganj police station एका पाेलिस कर्मचाèयाने पत्नीला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे ती महिला भावासह लकडगंज पाेलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आली. महिलेच्या पतीने पाेलिस ठाण्यात पाेहचून गाेंधळ घातला आणि एका पाेलिस उपनिरीक्षकालाही मारहाण केली. इतकेच नाहीतर या शिपायाने कपडे काढून पीएसआयला थेट लढण्याचेच आव्हान दिले. याप्रकरणी लकडगंज पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिस उपनिरीक्षक आदर्श भंडारे यांच्या तक्रारीवरून लकडगंज पाेलिस ठाण्यात काॅन्स्टेबल किरण विश्वनाथ कुकलारेविरुद्ध (वय 28) गुन्हा दाखल केला आहे. काही वर्षांपूर्वी किरण पाेलिस दलात रुजू झाला. काही महिन्यांपूर्वीच ताे एका प्रकरणात निलंबित झाला हाेता. न्यायालयात गेल्यानंतर किरणला नाेकरी परत मिळाली आणि दाेन दिवसांपूर्वीच त्याला मुख्यालयात ड्रायव्हर म्हणून नियुक्ती दिली. त्याला लकडगंज पाेलिस वसाहतीत क्वार्टरही दिले. काही दिवसांपूर्वी त्याने पत्नी लक्ष्मीला मारहाण केली. त्यामुळे ती घराबाहेर पडली. दरम्यान, गुरुवारी दुपारी लक्ष्मी त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी लकडगंज पाेलिस ठाण्यात गेली. किरणने तिला ाेनवरून धमकाविण्यास सुरुवात केली. कर्मचाèयांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्याशीही वाद घालू लागला. दुपारी 3 वाजता किरण हा पाेलिस ठाण्यात आला आणि लक्ष्मीला मारहाण सुरू केली. तिच्या भावाने अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही शिवीगाळ केली. पाेलिस उपनिरीक्षक आदर्श भंडारे यांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनाही शिवीगाळ केली आणि मारहाण करत धमकाले. शेवटी पाेलिसांनी बळाचा वापर करून त्याला आवरले. वरिष्ठांना किरणच्या कृत्याची माहिती दिली आहे. त्यांनी चाैकशीचे आदेश दिले आहे.