मुंबई,
Balaji Motion Pictures यांनी ‘रागिनी 3’ची अधिकृत घोषणा करताच बॉलीवूडमध्ये उत्सुकतेची लाट उसळली आहे. थरार, विनोद आणि मनोरंजनाचा संगम असलेला हा हॉररपट प्रेक्षकांना वेगळा सिनेमॅटिक अनुभव देईल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. डेट नाईटच्या पार्श्वभूमीवर उलगडणारी ही कथा रोमांचक वळणांनी भरलेली असेल, अशी चर्चा चित्रपटसृष्टीत रंगू लागली आहे.
या चित्रपटात मुख्य भूमिकेत Tamannaah Bhatia झळकणार असून त्यांच्या व्यक्तिरेखेत ग्लॅमरसोबतच इंटेन्सिटी आणि थराराचा प्रभावी संगम पाहायला मिळणार आहे. विविधांगी भूमिका आणि दमदार स्क्रीन प्रेझेन्समुळे तमन्नाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘रागिनी 3’मधील त्यांची भूमिका बोल्ड आणि लक्षवेधी ठरणार असल्याचे संकेत आहेत.
दिग्दर्शनाची Balaji Motion Pictures जबाबदारी Shashanka Ghosh यांनी स्वीकारली आहे. यापूर्वी त्यांनी Veere Di Wedding आणि Freddy सारख्या चित्रपटांतून आपली वेगळी शैली सिद्ध केली आहे. घोष आणि बालाजी मोशन पिक्चर्स यांचे हे पुनर्मिलन असल्याने प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिक वाढल्या आहेत. क्रिएटिव्ह प्रक्रियेत Sahir Raza यांचाही महत्त्वाचा सहभाग असून टीमच्या सहकार्यामुळे चित्रपटाचे स्केल अधिक भव्य आणि आकर्षक बनत असल्याचे सांगितले जाते.चित्रपटात Junaid Khan देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. वेगळ्या आणि प्रभावी भूमिकांसाठी ओळख असलेले जुनैद या चित्रपटातून नवा पैलू साकारताना दिसतील. तमन्ना आणि जुनैद यांची जोडी प्रेक्षकांसाठी ताजी आणि रोमांचक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.निर्माती Ekta Kapoor यांच्या नेतृत्वाखाली तयार होणारा हा चित्रपट Balaji Telefilms च्या बॅनरखाली साकारला जात आहे. ‘रागिनी’ फ्रँचायझीचा हा नवा अध्याय अधिक बोल्ड, फ्रेश आणि स्टायलिश हॉरर अनुभव देणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत आणि इतर तपशीलांबाबत अधिकृत घोषणा अद्याप बाकी असली, तरी ‘रागिनी 3’बद्दलची उत्सुकता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.