राज्यात एटीएसने मोठी कारवाई 'खळबळ उडाली'

    दिनांक :15-Feb-2026
Total Views |
मुंबई
ATS Maharashtra महाराष्ट्रमध्ये एटीएसने राज्यव्यापी मोठी कारवाई राबवली असून यवतमाळ आणि अहमदनगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी छापेमारी सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद व उमरखेडमध्ये १४ ठिकाणी, तर अहिल्यानगरमध्ये ७ ठिकाणी एटीएसने छापेमारी केली आहे. ही कारवाई दहशतवादी संघटनांच्या संपर्कात राहून काही तरुणांना सक्रिय करण्याच्या संशयावरून करण्यात आली आहे.जवळपास २१ ठिकाणी सकाळपासून सुरू असलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने राबवली जात असून राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
 

ATS Maharashtra  
अहमदनगरच्या मुकुंदनगरमध्ये ATS Maharashtra  एटीएसने मध्यरात्री छापेमारी केली. या परिसरातील नागरिकांची गोपनीय चौकशी करण्यात आली. मुकुंदनगर हा मुस्लिमबहुल भाग असून गेल्या काही वर्षांत या भागातील तरुणांना भडकवण्याचे प्रयत्न समोर आलेले आहेत. तसेच, पाकिस्तानसह बाह्य दहशतवादी संघटनांच्या उद्दातीकरणाच्या संपर्काची माहिती या भागाशी जोडली जात आहे. यापूर्वी अल्पसंख्यांक समाजातील काही तरुणांना भडकवण्याचे प्रयत्न समोर आले असल्यामुळे एटीएसची ही छापेमारी महत्त्वाची ठरली आहे.
 
 

यवतमाळमध्ये २० पथक दाखल
यवतमाळ जिल्ह्यात एटीएसचे ATS Maharashtra  २० पथक दाखल झाले असून उमरखेड व पुसदमधील संशयितांची कसून चौकशी करण्यात येत आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी देखील या कारवाईत सहभागी झाले आहेत. रात्रभर गोपनीय पद्धतीने चाललेल्या या कारवाईत अनेकांची चौकशी झाली असून काही संशयितांना ताब्यातही घेतले गेले आहे. विदर्भासह पश्चिम व मध्य महाराष्ट्रातील विविध ठिकाणी रात्रभर ही कारवाई राबवण्यात आली.विदर्भातील चार ते पाच ठिकाणी आणि अहमदनगरच्या मुकुंदनगरमध्ये एटीएसने दहशतवादी कारवायांशी संबंधित काही संशयितांची कसून चौकशी केली. संशयितांच्या घरांवर छापेमारी करत स्थानिक नागरिकांकडूनही माहिती मिळवण्यात आली आहे. संभाव्य घातपाताचा संशय लक्षात घेऊन एटीएसने तातडीने ही कारवाई राबवली असल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, आज महाशिवरात्र असून विविध मंदिरांत भाविकांची मोठी गर्दी आहे. शिवजंयतीसह ATS Maharashtra  इतर प्रमुख कार्यक्रम व सणदेखील पार पडत आहेत. अशा पार्श्वभूमीवर ही कारवाई अधिकच महत्त्वाची मानली जात आहे. अद्याप या कारवाईत कोणाला अटक करण्यात आली आहे की नाही, त्याची माहिती स्पष्ट झालेली नाही, परंतु ताब्यात घेण्यात आलेल्या काही संशयितांची चौकशी सुरू आहे.राज्यभरात या छापेमारीने वातावरण तणावपूर्ण केले असून स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क असल्याचे दिसत आहे.