सराफा व्यावसायिकावरील दरोड्याचा उलगडा

-४८ तासात सात दरोडेखोर ताब्यात -१ कोटी १२ लाखाचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :15-Feb-2026
Total Views |
अमरावती, 
bullion-merchant-robbery-solved : गुन्हे शाखा अमरावती शहर शाखेने गाडगे नगर येथील ज्वेलर्सच्या धाडसी दरोडयातील ७ आरोपीतांना ४८ तासाच्या आत ताब्यात घेवुन सुमारे ७०० ग्रॅम सोन्याचे दागीणे, रोख रक्कम व गुन्हयात वापरलेले वाहन, असा एकुण १ कोटी १२ लाख ३२ हजाराचा मुददेमाल जप्त केला आहे, या कारवाईची माहिती रविवारी संध्याकाळी पोलिस आयुक्त यांनी दिली. सैयद इम्रान सैयद मिर उर्फ दबंग (वय ३२ वर्ष रा. लालखडी), फिरोज खान कासम खान (वय ३२ वर्ष रा. विस्मील्ला नगर), शोएब खान अमीन खान (वय २१ वर्ष रा. रहमत नगर), शेख इम्रान उर्फ इम्मु शेख रहेमान (वय ३३ वर्ष रा. हबीब नगर), शेख रिज्ञावान उर्फ कालु अब्दुल रहेमान खान (वय १९ वर्ष रा. हैदरपुरा), शुभम उर्फ बंटी ज्ञानेश्वर खंडारे (वय ३३ वर्ष रा. ग्राम कठोरा बु.), सुरज सिध्दार्थ तायडे (वय ३५ वर्ष रा. बोरगांव धर्माळे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. सुशांत शेरेकर यांचे सुमित्रा ज्वेलर्स नावाचे दुकान स्वावलंबी नगर येथे आहे.
 
 
 
AMT
 
 
 
१३ फेब्रुवारीला ते रात्री ९ वाजता दुकान बंद करून दुकानातील संपुर्ण सोन्याचे दागीणे व नगद रक्कम घेऊन दुचाकीने घरी जात होते. दरम्यान पाठीमागुन एक चारचाकी गाडी आली. गाडीत बसलेल्यांनी सुशांत यांचे गाडीला धक्का देवुन लोटले. गाडीमधुन ३ अनोळखी इसम बाहेर निघुन त्यापैकी एकाने सुशांत त्याला चाकुचा धाक दाखवला. त्यांच्या दुचाकीची चाबी जबरीने घेवुन डिक्कीतील ७०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीणे व १ लाख ७० हजार नगदी असा मु‌द्देमाल जबरीने चोरून नेला. गुन्हा दाखल झाल्यावर तपास सुरु झाला. पोलीस आयुक्त यांनी सदर घटनेचा तपास वेगाने करण्याच्या सूचना दिल्या. गुन्हे शाखेने ४ वेगवेगळे पथक तयार आरोपींच्या शोधात पथके रवाना केली. गुप्त बातमीदारांची माहिती आणि सि.सि.टि.व्हि फुटेजचे तांत्रिक विश्लेषन करून सदर गुन्हा कोणी केला याची माहिती मिळाली त्या आधारावर महाराज रेस्टॉरेन्ट, नांदगांव पेठ येथे छापा टाकण्यात आला. एकुण ७ आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले. दरोड्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला. आणखी सविस्तर तपास केला असता त्यांचे कडुन या गुन्हया व्यतिरीक्त अन्य ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली त्यांनी दिली.
 
 
सदरची कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे, रमेश धुमाळ, शिवाजी बचाटे, कैलास पुंडकर यांचे मार्गदर्शनात गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक संदिप चव्हाण यांच्या नेतृत्वात स.पो.नि. मनिष वाकोडे, महेश इंगोले, सपोनी इम्राण नाईकवाडे, पोउपनि गजानन सोनुने, पोलीस अंमलदार सुनिल लासुरकर, सतिश देशमुख, दिपक सुंदरकर, गजानन ढेवले, मनोज ठोसर, आस्तिक देशमुख, मंगेश परिमल, झहीर शेख, सचिन बहाळे, झहीरूद्दीन शेख, मंगेश लोखंडे, प्रशांत मोहोड, नापोका विकास गुडधे, अतुल संभु, मिर्झा नईम बेग, नाझीम उद्दीन सैयद, पोका विशाल वाकपांजर, सागर ठाकरे, रंजीत गावंडे, राजीक रायलीवाले, सुरज चव्हाण, निखील गेडाम, योगेश पवार, चालक संदीप खंडारे, प्रभात पोकळे, चेतन शर्मा, राहुल दुधे, तसेच पो.स्टे गाडगे नगर प्रभारी अधिकारी अतुल वर व सायबर सेल येथिल पो.नि. अंभोरे, अनिकेत कासार, प्रियांका कोटावार, पोका. चेतन गुल्हाने, अश्विन यादव, सुषमा आठवले यांनी केली आहे.