महाराष्ट्राचे आराध्य दैवत Chhatrapati Shivaji Maharaj छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना अन्य ऐतिहासिक व्यक्तीशी केल्याच्या निषेधार्थ राळेगाव शहरात संतापाची लाट उसळली. राळेगाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने रविवार, 15 फेब्रुवारी रोजी शहरातील क्रांती चौक येथे दुपारी 12 वाजता तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्याच्या वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. या निषेध सभेचे संचालन महामंत्री अभिजित कदम यांनी केले. कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष छाया पिंपरे, माजी नगर पंचायत अध्यक्ष बबन भोंगारे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रसाद ठाकरे, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष राजू गुंडेचा, अॅड. प्रीतेश वर्मा, शहर अध्यक्ष शुभम मुके, संदीप पेंदोर या पदाधिकाऱ्यांनी निषेधपर भाषणे केली.
सभेदरम्यान उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून Chhatrapati Shivaji Maharaj शिवाजी महाराजांच्या राष्ट्रनिर्माण कार्याचा गौरव करत अशा प्रकारच्या वक्तव्यांचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला. कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना असून अशा विधानांमुळे जनतेच्या भावना दुखावल्या जात असल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केले. सभेदरम्यान कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदविला व भविष्यात अशा प्रकारची वक्तव्ये करणाèयांविरोधात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. या वेळी डॉ. कृणाल भोयर, सुधाकर गेडाम, सचिन चौहान, संदीप तेलंगे, गणेश देशमुख, उषा भोयर, कविता गेडाम, अनिल वर्मा, अशोक वर्मा, डॉ. अशोक थोडगे, डॉ. कोकरे, निलय घिनमिने, सौरभ पवार, प्रदीप भोयर, नितीन झाडे, अरुण शिवणकर, प्रकाश खुडसंगे, प्रतीक काळे, अरुण लोखंडे, प्रवीण शेलोटे, अरुण देहारे, चौधरी, संकेत झाडे, किन्नाके, शुभम तोटे, गौरव केवटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.