मुंबई/जालना
Harshvardhan Sapkal, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केली असल्याच्या विधानानंतर राज्यभरात तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटली आहे. भाजपच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांकडून आंदोलन सुरू झाले असून, जालन्यात भाजप आमदार नारायण कुचे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
नारायण कुचे यांनी आपल्या वक्तव्यानुसार, “टिपू सुलतान हा गंधा माणूस आहे. त्याने आई-बहीण असेल आणि जातीजातीत भांडण लावण्याचे काम केले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी तात्काळ माफी मागावी,” असे स्पष्ट केले. त्यांच्या या विधानाने विरोधकांसह नागरिकांचेही लक्ष वेधले आहे.पनवेलमध्येही राजकीय वातावरण तापले असून, भाजपकडून प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी चौकात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक जमले. आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी केली गेली, तसेच महिलांनी आक्रमक भूमिका घेत सकपाळ यांच्या प्रतिमेला चप्पल मारून संताप व्यक्त केला. “छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही,” असे आंदोलनकर्त्यांनी इशार्यात म्हटले.राज्यात इतर ठिकाणीही निषेध करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपकडून क्रांती चौकात पोस्टरला जोडे मारून विरोध व्यक्त केला गेला, तर नागपूरमध्ये भाजप युवा मोर्चाने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केले. पोलिसांनी येथे मोठा बंदोबस्त ठेवला होता.राज्यभरात या विधानावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकीय तणाव वाढलेला दिसून येत आहे, तर नागरिक आणि पक्षकार्यदेखील यावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत.