'हमारी छोरीया, छोरो से कम हे के', विजयाच्या जल्लोषात हस्तांदोलन नाकारले!VIDEO

    दिनांक :15-Feb-2026
Total Views |
कोलंबो,
IND vs PAK : कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या भारतीय आणि पाकिस्तानी पुरुष संघांमधील सामन्यावर सर्वांचे लक्ष आहे, खेळाडूंमध्ये हस्तांदोलन झालेले नाही. यापूर्वी, १५ फेब्रुवारी रोजी बँकॉकमध्ये झालेल्या महिला आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत भारतीय महिला अ आणि पाकिस्तान महिला अ संघांमध्ये गट अ सामना खेळला गेला. भारतीय महिला अ संघाने हा सामना आठ विकेट्सने जिंकला, तर पाकिस्तानी खेळाडूनी हस्तांदोलनसाठी हात पुढे करताना दिसल्या, पण भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन न करण्याचे धोरण कायम ठेवले.
 
 

IND VS PAK 
 
 
सामना जिंकल्यानंतर, दोन्ही भारतीय खेळाडू डगआउटमध्ये परतल्या.
 
टीम इंडियाने पाकिस्तान महिला अ संघाविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी दाखवत पाकिस्तानी महिला संघाला केवळ ९३ धावांवर रोखले. त्यानंतर भारतीय महिला अ संघाने केवळ १०.१ षटकांत दोन विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. टीम इंडियाकडून वृंदा दिनेशने ५५ धावांची शानदार नाबाद खेळी करत सहज विजय मिळवला. भारतीय महिला अ संघाने चौकार मारून विजय मिळवताच, वृंदा आणि तेजल दोघांनीही एकमेकांचे अभिनंदन केले, आनंद व्यक्त केला आणि लगेचच डगआउटकडे निघाल्या. लाजिरवाण्या पराभवाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानी महिला अ संघाचे तोंड पडण्याचे कारण होते.